अभियंता पाटील याच्याकडे तक्रारदाराने निधीची मागणी केल्यानंतर त्याने बांधकामात बदल सांगितले. परंतु, आता जुने कामाचे बिल नव्या दराने हवे असेल तर पैशाची मागणी केली. यासाठी एकूण सव्वा लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ४० हजार घेतले त्याच वेळी एसीबीने पाटीलला पकडले.
यानंतर एसबीने चौकशी सुरु केली असता पाटीलच्या घरात १ लाख ६१ हजार रुपये रोख आणि १८ तोळे ३ ग्रॅम सोने सापडले. तसेच एसबीआय बँकेतील लॉकर पथकाने बुधवारी उघडले असता त्यात मोठे घबाड समोर आले. पाचशे आणि दोन हजाराच्या बंडल भरलेलं लॉकर पाहून अधिकाऱ्यांचे धक्काच बसला. त्या एकाच लॉकरमध्ये ८५ तोळे सोन्याचे दागिने आणि २६ लाख ४ हजार ५०० रुपयांची रोकड सापडली आहे.
यामुळे लाचखोर संजय पाटीलने लाचेच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्थावर मालमत्ता खरेदी केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. इतकंच नाहीतर शेती, फ्लॅट, प्लॉट, बंगला यामध्येसुद्धा गुंतवणूक केल्याची शक्यता असल्याने त्या मालमत्तेची खुली चौकशी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.