कोल्हापूर : मुलगा होत नाही म्हणून पत्नीला रॉकेल ओतून जिवंत जाळणाऱ्या अल्ताफ बुढेलाल उर्फ दादेसाब चमनशेख या आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी आजन्म जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तसंच बुढेलाल उर्फ दादेसाब जिनासाब चमनशेख, सरदारबी बुढेलाल चमनशेख (रा. कुडची, ता. रायबाग, जि. बेळगाव) या दोघांना दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा दिली. या खटल्यातील आणखी एक आरोपी महाबुबी तौफीक बदनकारी यांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. (Kolhapur Crime News)

अल्ताफ शेख हा पत्नी शाहिस्ता हिच्यासह करवीर तालुक्यातील उचगाव येथे राहत होता. दोघांना तीन मुली होत्या. शाहिस्ताला मुलगा होत नाही म्हणून पती अल्ताफ सतत त्रास देत होता. अल्ताफचे वडील बुढेलाल चमन शेख, आई सरदारबी आणि बहीण महाबुबी हे शाहिस्ताला सतत काहीही कारण काढून त्रास देत होते. ३० डिसेंबर २०१३ रोजी अल्ताफचे आई वडील कुडची येथून अल्ताफकडे उचगाव येथे राहायला आले होते.

चालत्या बसमध्ये महिला करायच्या असं काही काम, पोलिस सुद्धा चक्रावले…

शाहिस्ताला मुलगा होत नाही, तिला मारुन टाक म्हणून आई-वडिलांनीही अल्ताफला भडकावले. त्यानंतर अल्ताफने रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शाहिस्ताच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. हा प्रकार अल्ताफची तीन वर्षाची मुलगी अरबियाने पाहिला. अल्ताफने शाहिस्ताला सीपीआर हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. ती ९६ टक्के भाजली होती. उपचार सुरू असताना ती बोलत होती. जखमी अवस्थेत शाहिस्ताने पतीविरोधात पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर नायब तहसीलदार अनंत गुरव यांनी तिचा मृत्युपूर्व जबाब घेतला. उपचार सुरू असताना २ जानेवारी २०१४ रोजी तिचा मॄत्यू झाला. पोलिसांनी पती अल्ताफ याच्यासह चौघांविरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक ए आर कांबळे यांनी तपास करत संशयितांविरोधात कोर्टात आरोपपत्र दाखल केले.

जिल्हा सत्र न्यायाधीशांसमोर या खटल्याची सुनावणी झाली. जिल्हा सरकारी वकील विवेक शुक्ल यांनी १४ साक्षीदार तपासले. या गुन्ह्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारअरबिया चमनशेख, नायब तहसीलदार गुरव, डॉक्टर मकानदार, डॉक्टर भोई, डॉक्टर सत्येंद्र ठोंबरे यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. जिल्हा सरकारी वकिलांचा युक्तिवाद आणि त्यांनी सादर केलेले न्याय निवाडे कोर्टाने ग्राह्य म्हणून आरोपी अल्ताफ चमनशेख याला दोषी धरून आजन्म जन्मठेप आणि १० हजार रुपये दंड ठोठावला. तसंच अल्ताफच्या आई-वडिलांना दोन महिन्यांची सक्तमजुरी शिक्षा आणि ५ हजार रुपये दंड ठोठावला. तसंच या प्रकरणात अल्ताफच्या बहिणीची निर्दोष मुक्तता केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here