मुंबई: दिल्लीत तबलिगी जमातच्या मरकजमध्ये सहभागी झालेल्या सर्व व्यक्तींनी आपल्या प्रवासाचा तपशील मुंबई महापालिकेच्या हेल्पलाइन क्रमांकावर, तसंच इतर विभागातील नागरिकांनी संबंधित जिल्हा नियंत्रण कक्षाकडे द्यावी. तसं केलं नाही तर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांसह विविध जिल्हा प्रशासनांकडून देण्यात आला आहे.

नवी दिल्लीतील निजामुद्दीन येथे तबलिगी जमातीच्या मरकजमधून आलेल्यांपैकी अनेकांना करोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. हा आकडा मोठा आहे. त्यामुळं करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मरकजमध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी प्रवासाची माहिती संबंधित प्रशासनाला द्यावी, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे. या सर्वांनी मुंबई महापालिकेच्या १९१६ या हेल्पलाइन क्रमांकावर प्रवासाचा तपशील आणि इतर माहिती द्यावी. असं न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.

माहिती देणं बंधनकारक

मरकजहून परत आलेल्या नागरिकांनी प्रशासनास स्वत:हून माहिती देणे बंधनकारक आहे. अद्याप माहिती न दिलेल्या नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. जे नागरिक संपर्क साधून माहिती देणार नाहीत अशांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशारा नागपूरचे विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिला. नागपूर येथे परतलेल्या नागरिकांसाठी आमदार निवास, वनामती व रवीभवन येथील विलगीकरण केंद्रात सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित नागरिकांनी जिल्ह्याच्या नियंत्रण कक्षात स्वतःहून माहिती द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्हानिहाय करोना नियंत्रण कक्ष

जिल्हाधिकारी, नागपूर – ०७१२ २५६२६६८
नागपूर महानगर पालिका – ०७१२ २५६७०२१
जिल्हाधिकारी, वर्धा – ०७१५२ २४३४४६
जिल्हाधिकारी, भंडारा- ०७१८४ २५१२२२
जिल्हाधिकारी, चंद्रपूर – ०७१७२ २७२४८०
जिल्हाधिकारी, गडचिरोली – ०७१३२ २२२०३१
जिल्हाधिकारी, गोंदिया – ०७१८२ २३०१९६

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here