Nawab Malik | नवाब मलिक यांना जामिनावर सोडण्यासाठी पैशांची मागणी. दुबईतून फोन कॉल. नवाब मलिक यांचा मुलगा आमिर मलिक (Amir Malik) याने यासंदर्भात मुंबई पोलिसांकडे तक्रार केली आहे.

हायलाइट्स:
- २३ फेब्रुवारी रोजी ‘ईडी’ने नवाब मलिक यांना अटक केली होती
- नवाब मलिक यांच्या खात्याचा कारभार दुसऱ्या नेत्यांकडे सोपवणार
२३ फेब्रुवारी रोजी ‘ईडी’ने नवाब मलिक यांना अटक केली होती. सुरुवातीला त्यांचा मुक्काम ईडीच्या कोठडीत होता. त्यानंतर मलिक यांना आर्थर रोड तुरुंगातील न्यायालयीन कोठडीत हलवण्यात आले होते. नवाब मलिक तुरुंगात गेल्यामुळे भाजपकडून सातत्याने त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारवर दबाव आणला जात आहे.
आधीच नवाब मलिक तुरुंगात; फडणवीस त्यांना अजून अडकवणार?
नवाब मलिक बिनखात्याचे मंत्री
शरद पवार यांनी गुरुवारी नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नवाब मलिक यांच्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आघाडी सरकारने मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला नसला तरी देखील त्यांच्याकडे असलेल्या विभागाचा कार्यभार इतर मंत्र्यांकडे सोपविण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्यापैकी अल्पसंख्याक खात्याचा कारभार जितेंद्र आव्हाड तर कौशल्य विकास खात्याची धुरा राजेश टोपे यांच्याकडे देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच मलिक यांच्याकडील परभणी आणि गोंदिया या जिल्ह्यांची पालकमंत्रिपदे देखील इतर मंत्र्यांकडे सोपविण्यात येतील.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Marathi News from Maharashtra Times, TIL Network