लंडन :

ब्रिटनची दिवंगत राजकुमारी डायना यांची मुलाखत मिळवण्यासाठी ‘फसवणूक‘ केल्याचं ‘बीबीसी‘ या वृत्तसंस्थेनं मान्य केलंय. उल्लेखनीय म्हणजे, घटनेच्या २६ वर्षानंतर बीबीसीनं आपली चूक मान्य करत बिनशर्त माफी मागितलीय. शिवाय, नुकसान भरपाई देण्याचीही तयारी दर्शवली आहे.

१९९५ साली ‘बीबीसी’नं राजकुमारी डायना यांच्या मुलाखतीसाठी त्यांचा खासगी सचिव पॅट्रिक जेफसन यांच्याशी संपर्क साधला होता. यावेळी, बीबीसी पत्रकार मार्टिन बशीर यांनी जेफसन यांची फसवणूक करून त्यांचा विश्वास संपादन केला. मात्र यामुळे जेफसन यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं, असं म्हणत ब्रिटनच्या राष्ट्रीय प्रसारक वृत्तसंस्था बीबीसीनं जेफसन यांची माफी मागितली आहे.

Gretta Vedler: पुतीन यांच्यावर टीका करून चर्चेत आलेल्या मॉडेलचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेहUkraine Crisis: युक्रेनियन चॅनलवर दिसला राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या आत्मसमर्पणाचा व्हिडिओ आणि…
कोण होती राजकुमारी डायना?

डायना या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचा मुलगा प्रिन्स चार्ल्स यांची पहिली पत्नी होती. ‘वेल्स राजकुमारी’ची उपाधीदेखील त्यांना देण्यात आली होती. डायनाचा जन्म ब्रिटनमधील एका शाही कुटुंबात झाला. ती जॉन स्पेन्सर, स्पेन्सरचे आठवे अर्ल आणि त्यांची पत्नी द ऑनरेबल फ्रान्सिस शेंड कीड यांचं चौथं अपत्य होती. सँडरिंगहॅम हाऊसमधील पार्क हाऊसमध्ये त्यांचं पालनपोषण पार पडलं. त्यांनी आपलं शिक्षण इंग्लंड आणि स्वित्झर्लंडमध्ये पूर्ण केलं होतं. १९७५ मध्ये जेव्हा तिच्या वडिलांना अर्ल स्पेन्सर ही पदवी मिळाली तेव्हा डायना लेडी डायना स्पेन्सर बनली.

विवाह आणि घटस्फोट

राजकुमारी डायना यांचा विवाह प्रिन्स चार्ल्सशी २९ जुलै १९८१ रोजी सेंट पॉल कॅथेड्रल इथं झाला. या टीव्हीवर लग्नाचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं. लग्नानंतर डायना यांना प्रिन्सेस ऑफ वेल्स, डचेस ऑफ कॉर्नवॉल, डचेस ऑफ रोथेसे, काउंटेस ऑफ चेस्टर आणि बॅरोनेस ऑफ रेनफ्रू या पदव्या मिळाल्या. या जोडप्याला प्रिन्स विल्यम आणि प्रिन्स हॅरी हे दोन अपत्यं झाले. परंतु, हा विवाह दीर्घकाळ टिकू शकला नाही. १९९६ मध्ये हे जोडपं विभक्त झाले.

Covid19: ओमिक्रॉन सब-व्हेरियंट BA.2 संक्रमणाबद्दल जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
Covid19: चीनमध्ये करोनाच्या BA.2 व्हेरियंटचा फैलाव, भारताची चिंताही वाढणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here