मॉस्को, रशिया :

रशियाची माजी जिमनॅस्ट आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची कथित प्रेयसी अलिना काबाएवा गेल्या कित्येत महिन्यांपासून बेपत्ता आहे. रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्धाला सुरुवात झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतीन आणि त्यांच्या कथित रहस्यमय प्रेयसीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली. या युद्धामुळे पुतीन यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या अनेक व्यक्ती अडचणीत आल्या आहेत. अमेरिकेकडून या व्यक्तींवर निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. आता, पुतीन यांची गर्लफ्रेंड अलिना काबाएवा हेदेखील अडचणीत सापडल्याचं समोर येतंय.

स्वित्झर्लंड‘मध्ये दाखल झाली याचिका

अलिना सध्या स्वित्झर्लंडमध्ये लपून बसल्याचं सांगण्यात येतंय. या दाव्यामागचं कारण म्हणजे, अलिना हिला स्वित्झर्लंडबाहेर काढण्यात यावं, अशा आशयाची एक याचिका या देशातील काही नागरिक-कार्यकर्त्यांनी केलीय.

स्वित्झर्लंडच्या काही कार्यकर्त्यांनी प्राधिकरणासमोर एक याचिका दाखल केलीय. अलिनासाठी अत्यंत वाईट गोष्ट म्हणजे, या याचिकेवर आतापर्यंत जवळपास ३० हजारहून अधिक नागरिकांनी ऑनलाईन सह्या करत ही मागणी रेटून धरलीय.

Princess Diana: राजकुमारी डायनाच्या मुलाखतीसाठी ‘फसवणूक’, २६ वर्षानंतर ‘बीबीसी’ची बिनशर्त माफी
Gretta Vedler: पुतीन यांच्यावर टीका करून चर्चेत आलेल्या मॉडेलचा सुटकेसमध्ये आढळला मृतदेह
खेळाडू म्हणून स्वत:ची ओळख

अलिना ही पुतीन यांच्या दोन किंवा तीन मुलांची आई असल्याचंही मानलं जातं. एक खेळाडू – जिमनॅस्ट म्हणून अलिनानं स्वत:ची ओळख तयार केली होती. तिनं तब्बल दोन वेळा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक, १४ वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि २५ युरोपीय चॅम्पियनशीप जिंकले.

खेळांतून निवृत्ती घेतल्यानंतर ती राजकारणात सक्रीय झाली. पुतीन यांच्या युनायटेड रशिया पक्षाची ती खासदार बनली. पुतीन यांच्यासोबत कथित संबंधांनंतर ती अधिक चर्चेत आली. मात्र, आता पुतीन यांच्यासोबतच्या संबंधांमुळेच ती अडचणीत सापडल्याचं समोर येतंय.

अलिना आणि पुतीन यांचे संबंध २००८ मध्ये पहिल्यांदा समोर आले होते. २०१८ साली अलिना ही सार्वजनिकरित्या अखेरची लोकांच्या नजरेस पडली होती. त्यावेळी ती दोन महिन्यांची गर्भवती होती. त्यानंतर २०१५ मध्ये अलिनानं पुतीन यांच्या एका पुत्राला जन्म दिल्याची बातमी समोर आली होती. तसंच २०१९ साली अलिनानं मॉस्कोतल्या एका रुग्णालयात दोन मुलांना जन्म दिल्याचंही वृत्त एका वृत्तपत्रानं दिलं होतं. मात्र, या दोन्ही वेळेस वृत्त प्रकाशित झाल्यानंतर रशियन वृत्तपत्रांना मोठा त्रास सहन करावा लागला. या वृत्तपत्रांना अलिनाशी संबंधीत आपल्या बातम्यांचं खंडन करावं लागलं.

पुतीन आणि त्यांची पत्नी ल्युडमिला

पुतीन यांनी १९८३ साली ल्युडमिला शक्रेबनेव्हा हिच्याशी विवाह केला होता. पुतीन – ल्युडमिला या जोडप्याला मारिया पुतिना आणि येकतेरिना पुतिना अशा दोन मुली आहेत. परंतु, पुतीन यांच्या दोन्ही मुलींना अतिशय रहस्यमय जीवन जगावं लागतंय. दोन्ही मुलांना आपल्या खोट्या ओळखीनंच आपलं शालेय-महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करावं लागलं. पुतीन यांनीही सार्वजनिकरित्या आपल्या कुटुंबाबद्दल कधी वक्तव्य केलं नाही.

दक्षिण कोरियात करोनाचा विस्फोट; २४ तासांत सहा लाख रुग्णांना लागण
Japan Earthquake: जपानला भूकंपाचा हादरा; दोघांचा मृत्यू, धावती बुलेट ट्रेन रुळावरून घसरली…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here