IPL 2022 vs MNS | मनसेच्या कार्यकर्त्यांनी दोन दिवसांपूर्वीत ताज हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या आयपीएल खेळाडुंच्या लक्झरी बसेसच्या काचा फोडल्या होत्या. २६ मार्च पासून आयपीएल २०२२ स्पर्धा सुरु होणार आहे.

 

IPL 2022 MnS
IPL 2022: ठाण्यातील दादोजी कोंडदेव येथे आयपीएलचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सराव करण्यासाठी येणार आहे.

हायलाइट्स:

  • २६ मार्च पासून आयपीएल २०२२ स्पर्धा सुरु होणार आहे.
  • यंदाच्या वर्षी आयपीएलचे सर्वाधिक सामने हे महाराष्ट्रात होणार आहेत

विराटचा संघ ठाण्यात येणार, मात्र मनसेकडून पालिकेच्या ‘या’ कृतीला विरोध

कल्पेश गोरडे, ठाणे: एकीकडे क्रिकेटप्रेमींना आयपीएलचे वेध लागले असताना दुसरीकडे मात्र ठाण्यात आयपीएल विरुद्ध मनसे असा सामना रंगलेला पाहायला मिळत आहे. आजपासून आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा (Royal challengers bangalore) संघ ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सराव करणार आहे. त्यासाठी ठाणे महानगर पालिकेच्यावतीने रंगरंगोटीच काम आणि रस्त्याच्या झाडाच्या फांद्या तोडण्याच काम हाती घेतलं आहे. मनसेकडून याविरोधात संताप व्यक्त करण्यात आला आहे.

महिन्याच्या अखेरीस म्हणजेच २६ मार्च पासून आयपीएल २०२२ स्पर्धा सुरु होणार आहे. यंदाच्या वर्षी आयपीएलचे सर्वाधिक सामने हे महाराष्ट्रात होणार आहेत. त्यासाठी ठाण्यातील दादोजी कोंडदेव येथे आयपीएलचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सराव करण्यासाठी येणार आहे. मात्र, हा संघ ठाण्यात येणार यासाठी ठाणे महानगर पालिकेच्या वतीने रस्त्यांवर रंगरंगोटीचं काम सुरु आहे. त्याचबरोबर संघाची गाडी ज्या मार्गाने स्टेडियमकडे जाणार आहे. त्या मार्गावरील झाडाच्या फांद्या छाटण्याचे काम देखील महापालिकेकडून सुरु आहे. या संपूर्ण प्रकाराला मनसेकडून मात्र विरोध दर्शवण्यात आला आहे. सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका असून ठाण्यातील पारा ४३ डिग्रीच्या पार झाल्याने नागरिकांच्या अंगाची काहीली होत आहे. त्यामुळे वृक्षतोड करणं अत्यंत आक्षेपार्ह असल्याचं सांगत मनसेने या वृक्षतोडीचा तीव्र निषेध करून या वृक्षतोडीला विरोध केला आहे.

मनसेकडून सध्या महाराष्ट्रातील मराठी भूमिपुत्रांच्या नोकरीचा मुद्दा चांगलाच धरून ठेवला आहे. तसे चित्र आता ठाण्यात देखील पाहायला मिळत आहे. ठाण्यात दादोजी कोंडदेव येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ सरावासाठी येणार आहे. आयपीएल सामन्यांसाठी संघांना लागणाऱ्या बस सेवेसाठी मनसे कडून आयपीएल शिष्टमंडळाची भेट घेण्यात आली होती. त्यासाठी मनसेचे वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक यांनी आयपीएलच्या शिष्टमंडळासोबत बैठक केली होती. त्यावेळी त्यांनी या सामन्यासाठी लागणाऱ्या बसेस आणि गाड्या याचे कंत्राट भूमिपुत्रांना देण्यात यावे अशी विनंती केली होती. मात्र आयपीएल शिस्तमंडळाकडून दिल्लीतील एका कंत्राटदाराला कंत्राट दिल्यामुळे भूमिपुत्रांचा अपमान केला असल्याचे सांगत मनसेच्या वाहतूक सेनेचे ठाणे अध्यक्ष आशिष डोके यांनी संताप व्यक्त केला आहे. जर त्या बसेस ठाण्यात आल्या तर त्या बसेसला मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या आदेशानुसार विरोध करण्याचा इशारावजा सज्जड दम ठाण्यातील मनसेचे वाहतूक सेनेचे ठाणे अध्यक्ष आशिष डोके यांनी दिला आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : ipl 2022 raj thackeray mns oppose for bus service from outside maharashtra for ipl royal challengers bangalore players
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here