मुंबई:नारायण राणे आणि नितेश राणे या पितापुत्रांचा राजकीय इन्शुरन्स संपला आहे, अशी टीका शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केली. नारायण राणे यांना दीर्घायुष्य लाभो. पण नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) कृपेने मिळालेले मंत्रीपद हे त्यांनी जनतेसाठी वापरावं. त्यांनी जनतेला योग्य प्रकारे मदत करावी. नाहीतर हे मंत्रीपद स्वाहा करतील, असेही विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी म्हटले. यावर आता राणे कुटुंबीय काय प्रतिक्रिया देतात ते पाहावे लागेल.

विनायक राऊत यांनी शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकार भक्कम असल्याचा दावा केला. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. आणखी अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार कायम राहील, असे राऊत यांनी म्हटले.
Nitesh Rane: नितेश राणे यांचा कणकवली तालुक्यातील प्रवेशाचा मार्ग मोकळा

संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपी व षडयंत्र रचणाऱ्याचा निषेध करणारा बॅनर

संतोष परब हल्ला प्रकरणातील आरोपी व षडयंत्र रचणाऱ्याचा निषेध करणारा फलक कणकवली तालुक्यातील करंजे गावात ग्रामपंचायतीच्या बाहेर लागलेला बॅनर सध्या सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. करंजे ग्रामपंचायती बाहेर कोणी अज्ञातांनी हा बॅनर लावला आहे . ऐन होळीच्या दिवशी बॅनर लागल्याने यावर ग्रामपंचायत व पोलीस काय कारवाई करणार हें पहावे लागेल.या बॅनर वर संतोष परब यांचा जखमा दाखवणारा व वृत्तपत्रातील कात्रणांचे फोटो या बॅनर वर लावण्यात आले आहेत.

संतोष परब हल्ला प्रकरणातील संशयीत आरोपी आमदार नितेश राणे आणि माजी जिल्ह्या परिषद सदस्य गोट्या सावंत यांना कणकवली प्रवेशास मुभा मिळालेली असतानाच लागलीच हा बॅनर लावण्यात आला.त्यामुळे या बॅनरची सर्वत्र चर्चा आहे. करंजे गावच्या सरपंचांना हा बॅनर कोणी लावला हे माहीत नाही. मात्र, गावातील वातावरण दूषित करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ग्रामपंचायत बॅनर हटविण्यासाठी संतोष परब यांना नोटीस दिली असून त्यांनी ती स्वीकारली नाही. ग्रामपंचायत आता पोलीस याच्या मदतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार पंचयादी घालून बॅनर काढणार आहेत. मात्र, हा बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here