नवी दिल्ली: दक्षिण कोरिया, चीनमध्ये करोनाचे नवे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. त्याचवेळी मध्य आशियाई देश इस्रायलमध्ये दोन रुग्ण आढळले आहेत, ज्यांच्यामध्ये करोनाचा नवीन व्हेरियंट आढळून आल्याचे स्पष्ट झाले आहे, असे सांगितले जात आहे. बुधवारी इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने बेन गुरियन आंतरराष्ट्रीय विमानतळावर दोन प्रवासी करोनाबाधित सापडले असून, त्यांच्यात ओमिक्रॉन व्हेरियंट बीए. १ आणि त्याचा सबव्हेरियंट बीए. २ असा एक व्हेरियंट आढळून आला आहे, असे सांगितले. या देशांमध्ये करोनाच्या नवीन व्हेरियंटचा होत असलेला फैलाव आणि वाढती रुग्णसंख्या या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशातील राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ताप आणि डोकेदुखी आणि मांसपेशींमध्ये वेदना

दरम्यान, या व्हेरियंटचे नेमके नाव आणि लक्षणांच्या संबंधी अधिकृत अशी अधिक माहिती मिळालेली नाही. मात्र, काही मीडिया रिपोर्टनुसार, इस्रायलमध्ये ज्या दोन रुग्णांमध्ये हा व्हेरियंट आढळून आला आहे, त्यांच्यात ताप, डोकेदुखी आणि मांसपेशींमध्ये वेदना आदी लक्षणे दिसून आली. इस्रायलच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले की, या व्हेरियंटसंबंधी अभ्यास करण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाचे महासंचालक नॅचमॅन एश यांच्या म्हणण्यानुसार, या व्हेरियंटचा प्रादूर्भाव केवळ इस्रायलमध्येच झाला असावा. तसेच दोन्ही प्रवासी विमानात बसण्यापूर्वीच संसर्गबाधित असू शकतात, अशीही शंका त्यांनी व्यक्त केली.

युरोपात पुन्हा करोनाचा फैलाव! भारत सरकारने दिला सावधानतेचा इशारा
‘नारायण राणे आणि नितेश राणे यांचा राजकीय इन्शुरन्स संपलाय’

करोनाची नवी लाट येऊ शकते का?

जागतिक आरोग्य संघटनेनुसार, ओमिक्रॉन विषाणूमुळे करोनाची नवीन लाट येण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या नवीन व्हेरियंटचे रुग्ण पूर्व युरोपमध्ये आढळून आलेले आहेत. त्यामुळेच अर्मेनिया, अरबैजान, बेलारूस, जॉर्जिया, युक्रेन आणि रशियात करोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. हॉंगकाँग, दक्षिण कोरिया या देशांमध्येही करोना रुग्ण वाढलेले दिसून येतात. दुसरीकडे, जूनपर्यंत करोनाची चौथी लाट येण्याची शक्यता आहे, असे आयआयटी कानपूरमधील तज्ज्ञांकडून सांगण्यात आले होते.

भारत सरकारने दिला सावधानतेचा इशारा

युरोप तसेच आशियाई देशांमध्ये करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करोनाबाबत सावध राहावे, अशा सूचना दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मालविया यांनी बुधवारी बैठक घेतली. यात वरिष्ठ आरोग्य अधिकारी होते. युरोप व पूर्व आशियाई देशांमध्ये पुन्हा करोनाचा उद्रेक झाल्याने उपाययोजनांसंबंधी चर्चा झाली. पुन्हा जेनोमिक सिक्वेन्सिंग हाती घ्यावे, आरोग्य कर्मचाऱ्यांनी दक्षता बाळगावी, असा सल्ला आरोग्यमंत्र्यांनी दिल्याचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले.

railway : रेल्वेने प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना दिलासा नाहीच, रेल्वेमंत्र्यांनी संसदेत सांगितले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here