मुंबई : धोनी, सचिन आणि कपिल देव यांच्यानंतर आणखी एका क्रिकेटरवर सिनेमा येतोय आणि त्याचं नाव आहे प्रविण तांबे. या खेळाडूची स्टोरी सुरू होते आणि काही क्षणात संपते, पण ती लाखोंना लढण्याचं बळ देऊन जाते. हा तोच खेळाडू आहे, ज्याने आयुष्यातील २० वर्ष फक्त गली क्रिकेटला दिली, ज्याला क्रिकेटर म्हणून नावारुपाला येण्यासाठी आयुष्यातली ४१ वर्ष खर्च करावी लागली, त्याची क्रिकेटमध्ये पहिल्यांदा वयाच्या ४१ व्या वर्षी दखल घेण्यात आली आणि जी काही संधी मिळाली त्याचं सोनं करत प्रविण तांबेने जगाला प्रेरणा दिलीय. याच मुंबईकर प्रविण तांबेची स्टोरी तुम्हाला सांगणार आहोत, ज्याच्यावर येणाऱ्या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय आणि या ट्रेलरनंतर प्रत्येक जण पाहतोय ते म्हणते कोण आहे प्रविण तांबे?
Hardik Pandya IPL 2022: गुजरात टायटन्सला बसू शकतो मोठा झटका, हार्दिक पंड्याच्या खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह
कधी कधी वेळ तुमची अशी परीक्षा घेते, जिथे गुडघे टेकण्याशिवाय पर्याय नसतो. पण प्रविण तांबे हे असं रसायन आहे, ज्याने वेळेचीच परीक्षा घेतली. एक परिपूर्ण क्रिकेटर असूनही त्याला कधीच योग्य संधी मिळाली नाही, तरीही तो क्रिकेटची देवासारखी पुजा करत राहिला. आयुष्यातला बहुतांश काळ क्रिकेटला देऊनही प्रविण तांबेला साधं प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची संधीही मिळाली नाही. अखेर द वॉल राहुल द्रविडने प्रविण तांबेतलं कौशल्य हेरलं ते २०१३ ला आणि राजस्थान रॉयल्सने या मुंबईकर खेळाडूला आपल्या ताफ्यात सहभागी करुन घेतलं. पण प्रविण तांबेची परीक्षा अजून संपलेली नव्हती. संघात सहभागी झाल्यानंतरही त्याला अंतिम ११ मध्ये खेळण्यासाठी मोठी वाट पाहावी लागली.
IPL 2022 च्या नव्या नियमाबाबत राजस्थानच्या खेळाडूने जाहीर केली नाराजी, ट्विट झालं भन्नाट व्हायरल…
पण आता वेळ प्रविण तांबेला जास्त काळ हुलकावणी देऊ शकत नव्हती. अखेर तो क्षण आला आणि प्रविण तांबेने जे टेकऑफ केलं, त्यानंतर भरारी सुरूच राहिली. प्रविण तांबेने एक अटॅकिंग बॉलर म्हणून ओळख मिळवली. २०१४ च्या आयपीएलचं सीजन त्याने असं काही गाजवलं, की क्रिकेट विश्वातल्या प्रत्येकाला प्रविण तांबेची दखल घ्यावी लागली. या सीजनमध्ये तो राजस्थानसाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. आधीच सर्वात वयस्कर आयपीएल पदार्पण करण्याचा विक्रम नावावर झालेल्या प्रविण तांबेने हॅट्ट्रिक घेतली आणि सर्वांच्या भुवया उंचावल्या. याच कामगिरीच्या बळावर राजस्थान रॉयल्सने फायनलमध्ये धडक मारली. यानंतर अ श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने विजय हजारे ट्रॉफीतही मुंबईचं प्रतिनिधित्व केलं.

प्रविण तांबेसाठी वय हा केवळ एक आकडा होता. कारण, त्याच्यातली क्रिकेट खेळण्याची भूक कधीही संपली नाही. आयुष्यात आपण ज्याला राईट टाईम म्हणतो, तो काहींसाठी वेळेवर येतो, तर तो काहींची परीक्षा घेतो. हाच राईट टाईम सचिन तेंडुलकरसाठी वयाच्या १६ व्या वर्षी आला, तर प्रविण तांबेसाठी वयाच्या ४१ व्या वर्षी आला. सततच्या अपयशाने वैतागला असाल किंवा परिस्थितीसमोर गुडघे टेकण्याचा विचार येत असेल तर प्रविण तांबेची स्टोरी एकदा डोळ्यासमोर आणा. कारण, प्रत्येकाला लढण्याचं बळ देणाऱ्या औषधाचं नाव आहे प्रविण तांबे.

प्रवीण तांबे, ज्याची परिस्थितीने २० वर्ष परीक्षा घेतली

प्रवीण तांबे, ज्याची परिस्थितीने २० वर्ष परीक्षा घेतली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here