औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात एक धक्कादाप्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. ज्यात काही तासांच्या अंतरात नर-मादी बिबट्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, याचवेळी मादी बिबट्याच्या गर्भाशयात तीन पिल्ले असल्याचं समोर आलं आहे. तर विषप्रयोग करून एकाच वेळी ५ बिबट्यांची हत्या करण्यात आल्याचं वनविभागाच्या तपासात समोर आले होते. दरम्यान, महाराष्ट्रातील अशा पहिल्याच दुर्मीळ गुन्ह्यात आरोपी ज्ञानेश्वर नंदलाल परदेशी (रा. पिंपरी माळेगाव, ता. सोयगाव) याचा नियमित जामीन अर्ज सत्र न्यायाधीश डॉ. एम. एस. देशपांडे यांनी गुरुवारी नामंजूर केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोयगाव तालुक्यातील जरंडी शिवारात शेतकरी ज्ञानेश्वर परदेशी याच्या बकरीचे पिल्लू बिबट्याने मारले होते. ही बाब त्याने त्याचा मामा बाबूसिंग रतन परदेशी याला सांगितली होती. त्या दोघांनी सुडाच्या भावनेतून संगनमताने मेलेल्या बकरीच्या पिलावर विष टाकले होते. तर बकरीचं मास खाल्ल्याने नर-मादी बिबट्याचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वनविभागाने ज्ञानेश्वर नंदलाल परदेशीच्या विरोधात कारवाई करत वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
सणाच्या दिवशीच शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज; शेतात काम करण्यासाठी गेला अन्
आरोपी ज्ञानेश्वरच्यावतीने जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. तर त्याच्या जमीन अर्जास विरोध करताना सहायक लोक अभियोक्ता राजू एस. पहाडिया यांनी बिबट्या हा वन्य प्राणी अनुसूची क्रमांक १ मधील प्राणी असल्याचं निदर्शनास आणून दिले. तसेच सदर वन गुन्हा अजामीनपात्र आहे. सर्वोच्च न्यायालयानेही वन्य प्राण्यांचे मानवी परिसंस्थेतील महत्त्व विषद केले आहे. म्हणून आरोपीला जामीन मंजूर करू नये अशी विनंती केली, त्यानंतर न्यायालयाने आरोपीचा जामीन नामंजूर केला.

बीडमधील ‘या’ गावात काढतात जावयाची गाढवावरुन ‘धिंड’; आठ दशकांची धुळवडीची परंपरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here