संयुक्त राष्ट्र :

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपुष्टात आणण्यासाठी मुत्सद्देगिरीची तयारी भारतानं दर्शवली आहे. भारताचे स्थायी प्रतिनिधी टी एस तिरुमूर्ती यांनी गुरुवारी ही माहिती दिली. सुरक्षा परिषदेत तसेच संबंधित पक्षांमध्ये या उद्दिष्टांचा पाठपुरावा सुरू ठेवण्यासाठी भारत आगामी काळात तयार असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

‘युक्रेनच्या नागरिकांची भारताला काळजी’

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की या दोघांशीही बोलून थेट संवाद साधत चर्चा करण्याचं आवाहन केलंय. रशियाकडून केल्या जात असलेल्या भीषण हल्ल्यांचा सामना करत असलेल्या लाखो रहिवाशांच्या भवितव्याबद्दल गंभीर चिंता अंडर-सेक्रेटरी-जनरल रोझमेरी डिकार्लो यांनी व्यक्त केलीय. रशिया आणि युक्रेन यांच्यातील चर्चेत काही सकारात्मक घडामोडीही घडल्या. परंतु त्यांचा फारसा उपयोग होऊ शकला नाही. ‘याच आठवड्यात युक्रेन आणि रशियाच्या प्रतिनिधींमध्ये सुरू असलेल्या थेट चर्चेसंदर्भात सकारात्मक संकेत समोर आले. यासंदर्भात सर्व प्रयत्नांचं आम्ही स्वागत करतो’, असंही त्यांनी नमूद केलं.

युक्रेनच्या शाळा-सांस्कृतिक केंद्रावर रशियाचा हल्ला, २१ जणांचा मृत्यू
Ukraine Crisis: रशियन रॉकेट हल्ल्यात युक्रेनियन अभिनेत्रीचा मृत्यू
या चर्चेनंतर रशियाकडून व्लादिमीर मेडिन्स्की आणि युक्रेनकडून मायखाइलो पोडोलिक यांनीही व्हिडिओद्वारे चर्चा केली. ‘मला मिळालेल्या माहितीनुसार, चर्चेदरम्यान परिस्थिती आधीपेक्षा अधिक वास्तववादी दिसत असल्याचं’ वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या चर्चेनंतर म्हटलं. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनीही २२ दिवसांच्या युद्धानंतर आशावाद व्यक्त करतानाच आपण एका कराराच्या जवळ पोहचत असल्याचं म्हटलं.

आम्ही संपूर्ण युक्रेनमधील युद्ध तत्काळ संपुष्टात आणण्याच्या आमच्या आवाहनाचा पुनरुच्चार करतो, असं तिरुमूर्ती यांनी म्हटलं. मानवतावादी मदतीचं राजकारण केलं जाऊ नये तसंच मानवता, तटस्थता, निष्पक्षता आणि स्वातंत्र्याच्या तत्त्वांनी मार्गदर्शन करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

मानवतावादी संकट कमी करण्यात योगदान देताना भारतानं १ मार्चपासून युक्रेन आणि शेजारील राष्ट्रांना अगोदरच ९० टन मदत पुरवठा धाडल्याचंही तिरुमूर्ती यांनी सांगितलं. ‘भारताकडून अशाच पद्धतीच्या इतर गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं पुरवठा धाडण्याचा प्रयत्न केला जाईल’, असंही त्यांनी म्हटलं.

Bangladesh: बांगलादेशच्या ढाकातील इस्कॉन मंदिरावर जमावाचा हल्ला
Alina Kabaeva: युक्रेन युद्धामुळे पुतीन यांची रहस्यमय प्रेयसी अडचणीत, ‘या’ देशातून बाहेर काढण्याची मागणी
Princess Diana: राजकुमारी डायनाच्या मुलाखतीसाठी ‘फसवणूक’, २६ वर्षानंतर ‘बीबीसी’ची बिनशर्त माफी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here