विवेक अग्निहोत्रींना मिळतेय जीवे मारण्याची धमकी
काय म्हणाले नाना पाटेकर?
बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की,’या सिनेमामुळे समाजामध्ये विनाकारण तेढ, तणाव निर्माण केला जात आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. देशातील हिंदू आणि मुस्लिम शांततेनं रहात आहेत. दोन्ही धर्मांचे लोक इथंच राहणारे आहेत. अशा परिस्थितीमध्ये देशातील वातावरणात द्वेष पसरवणं योग्य नाही.’

सिनेमामुळे समाजाचे दोन तुकडे होतील
नाना पाटेकर यांनी मुलाखतीमध्ये पुढं सांगितलं की, ‘ भारतामधील हिंदू आणि मुस्लिम इथले नागरिक आहेत. दोन्ही धर्मांतील लोकांना शांततापूर्ण वातावरणातच रहायचं आहे. दोन्ही धर्माच्या लोकांना एकमेकांची गरज आहे. ते एकमेकांशिवाय राहू शकत नाही. अशी परिस्थिती असताना या सिनेमामुळे वाद निर्माण करणं योग्य नाही. जे असा वाद निर्माण करत आहेत, ते का करत आहेत, याचं उत्तर देणं गरजेचं आहे. हा सिनेमा पाहिल्यानंतर समाज विभाजित होईल. समाजामध्ये अशा पद्धतीनं फूट पाडणं योग्य नाही.’
The Kashmir Files -‘बिट्टा कराटे’ चिन्मय मांडलेकरवर होतोय शिव्यांचा पाऊस, म्हणाला- मला हेच हवं होतं
विवेक अग्निहोत्रींना व्हाय दर्जाची सुरक्षा
दरम्यान, सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना केंद्र सरकारनं व्हाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली आहे. विवेक यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केल्यामुळे त्यांना काही लोकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये अनुपम खेर याच्याबरोबर दर्शन कुमार, पल्लवी जोशी, मिथुन चक्रवर्ती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा सिनेमा ११ मार्च रोजी ७०० स्क्रीन्सवर रिलीज करण्यात होता. आता हा संपूर्ण देशातील दोन हजारांहून अधिक स्क्रिनवर दाखवला जात आहे.