तर कांदा लागवडीसाठी लागणारी खते, बियाणे, कीटकनाशक औषधी फवारणीसह काढणीसाठी सुमारे ५० हजारांपेक्षा अधिक खर्च येतो. तर शेतकऱ्याचे कष्ट वेगळे,मात्र आज कांद्याला मिळत असलेला कवडीमोल भावाने लागवड व मजुरीचा खर्चदेखील मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. विशेष म्हणजे आधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठ नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे कांद्याच्या लागवडीतून तरी त्याची भरपाई होईल अशी अपेक्षा कांदे उत्पादक शेतकऱ्यांना होती. मात्र, कांद्याच्या भावाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.
शेतकऱ्यांना कांद्याने रडवलं! पंधरा दिवसात तब्बल दीड हजार रुपयांनी घसरण – onion price today in maharashtra in a fortnight it fell by a whopping one and a half thousand rupees
औरंगाबाद : आधीच अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच कंबरडे मोडले असताना आता कांद्याला भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्या विक्रीसाठी प्रसिद्ध असलेल्या औरंगाबादच्या लासूर कांदा मार्केटमध्ये गत वर्षभरात प्रथमच पंधरा दिवसात कांद्याच्या भावात तब्बल दीड हजार रुपयांनी घसरण झाली आहे. बुधवारी १६ मार्च रोजी कांद्याला सर्वाधिक ९५५ रुपयांचा भाव मिळाला होता.