औरंगाबाद : परभणी येथे काँग्रेसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात चक्क औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील कुख्यात मटका किंग आबेद कासम पठाण याला पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा पक्षप्रवेश चक्क काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थित झाला. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १२ मार्च रोजी परभणी येथे नाना पटोले यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्यासह काही कार्यक्रम पार पडले. यावेळी पैठण येथील मटका किंग म्हणून ओळख असलेला आणि अनेक गुन्हे दाखल असलेला आबेद कासम पठाण याला नाना पटोले यांच्या उपस्थित काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला. विशेष म्हणजे या पक्ष प्रवेशाचे काही फोटोसुद्धा सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले आहे. त्यामुळे भाजपला गुंडाचा पक्ष म्हणून टीका करणाऱ्या काँग्रेसकडून चक्क मटका किंगला पक्षात प्रवेश देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

संतापजनक! बिबट्याने शेळी खाल्ली म्हणून घेतला सूड, रागाच्या भरात केलं भयंकर कृत्य

कोण आहे आबेद पठाण?

आबेद पठाण हा पैठण शहरात मटका चालवतो. यापूर्वी त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात ३ फेब्रुवारी रोजी सुद्धा त्याला विनापरवाना बेकायदेशीर कल्याण नावाचा जुगाराच्या ( मटका ) कारवाईत अटक करण्यात आली होती. तर २०२० मध्ये याच मटका किंग आबेदसोबत पैठणचे तीन पोलीस कर्मचारी भारत-ऑस्ट्रोलिया क्रिकेट सामना पाहण्यासाठी स्टेडीयमवर गेले होते. तसेच क्रिकेट सामना पाहताना त्यांनी सोशल मिडियावर स्वत:चे फोटो अपलोड केले. त्यानंतर ही बाब तत्कालीन पोलीस अधिक्षकांना समजताच त्यांनी तिघांना तडकाफडकी निलंबीत केले होते.

शेतकऱ्यांना कांद्याने रडवलं! पंधरा दिवसात तब्बल दीड हजार रुपयांनी घसरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here