औरंगाबाद : फडणवीस सरकारच्या काळात घोषणा करण्यात आलेल्या अनेक योजना ठाकरे सरकराने बासनात गुंडाळलल्या आहेत. त्यातलीच एक म्हणजे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वकांशी वॉटर ग्रीड योजनेचा सुद्धा समावेश आहे. मात्र, आता याच योजनेच्या अंमलबजावणीसाठी आता इस्त्रायली अधिकारीच सरसावले असून त्यांनी हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी राज्य शासनाने इस्रायलला सहकार्य करावे, अशी विनंती थेट राज्यपालांकडे केली आहे.

इस्रायलच्या एशिया आणि पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक राफाएल हर्पाज सध्या भारत भेटीवर आहेत. त्यांनी गुरुवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची सदिच्छा भेट घेतली. या बैठकीला इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी व राजकीय सल्लागार अनय जोगळेकर उपस्थित होते. दरम्यान, मराठवाड्यातील पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्याच्या दृष्टीने इस्रायलमधील राष्ट्रीय जलव्यवस्थापन कंपनी मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी आराखडा तयार करत आहे. करोनाकाळात लांबणीवर पडलेला हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी राज्य शासनाने इस्रायलला सहकार्य करावे, अशी विनंती इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांनी राज्यपालांकडे केली.

शेतकऱ्यांना कांद्याने रडवलं! पंधरा दिवसात तब्बल दीड हजार रुपयांनी घसरण
राज्य सरकारने मराठवाड्याचा तळतळाट घेऊ नये…

एकीकडे इस्त्रायलच्या अधिकाऱ्यांनी राज्यपालांची भेट घेतली तर दुसरीकडे विधानसभेत भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी सुद्धा वॉटर ग्रीड योजना रखडल्याचा मुद्दा उपस्थित केला. ठाकरे सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी शंभर रुपये सुद्धा खर्च केले नाही. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील आणि खऱ्या अर्थाने मराठवाड्यातील पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी आणि उद्योगाला पाणी द्यायचे असेल तर, मराठवाडा वॉटर ग्रीड साठी मुबलक निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी लोणीकर यांनी गविधानसभेत केली.

संतापजनक! बिबट्याने शेळी खाल्ली म्हणून घेतला सूड, रागाच्या भरात केलं भयंकर कृत्य

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here