दौंड : दौंड तालुक्यातील कानगाव येथे एका ११ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. पैशांचे आमिष दाखवून आणि जीवे मारण्याची धमकी देत एका तरुणाने पीडित मुलीवर वेळोवेळी अत्याचार केला. या प्रकरणात यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. मयूर पांडुरंग फडके (रा. कानगाव, ता. दौंड) असं यवत पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. (Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, मयूर हा येथील एका ११ वर्षीय मुलीची गेल्या काही महिन्यांपासून छेड काढत असे. तिच्या घरात कोणी नसल्याचं पाहून त्याने तिला पैशांचे आमिष दाखवत वेळोवेळी अत्याचार केले. अनेकदा ही मुलगी घरात असताना तो तिला कुणाला काही सांगू नकोस नाहीतर मी तुला मारून टाकेन, अशी धमकी देत तिच्यावर अत्याचार करत होता. अनेकदा तिच्या भावाला खाऊ आणायला पाठवून तो त्या मुलीवर बळजबरी करत असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे. दरम्यानच्या काळात, या मुलीने आपल्याला त्रास होऊनही घरात याबद्दल कल्पना दिली नव्हती.

Ratnagiri burglary : संगमेश्वरमधील देवळेमध्ये भरदिवसा घरफोडी; सोने आणि रोख रकमेवर डल्ला

मागील काही दिवसांपूर्वी ही मुलगी वस्तू आणण्यासाठी दुकानात गेली होती. त्यावेळी आरोपी मयूर हा तिच्याशी बोलत होता. त्यावेळी ही बाब तिच्या वडिलांच्या लक्षात आली. त्यावेळी तिला मयूरशी काय बोलत होती याबद्दल विचारणा केली असता तिने झालेल्या प्रकाराबद्दल कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर कुटुंबीयांनी पाटस पोलीस दूरक्षेत्रात या प्रकरणी तक्रार दिली. त्यानंतर यवत पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपी मयूर फडके याला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here