गावातील एक गट देवीच्या मंदिरावर थांबतो आणि दुसरा गट मंदिराच्या पायथ्याशी थांबतो आणि सुरू होते दगडांची धुळवड. शिमग्याच्या दुसऱ्या दिवशी धुळीवडीला दिवसभर येथील तरुण दगड-गोटे जमा करतात आणि संध्याकाळी त्याच दगडांनी एकमेकावर हल्लाबोल करुन धुळवड साजरी करतात. एकमेकांवर दगडांचा तुफान वर्षाव केला जातो. यामध्ये अनेक तरुण जखमीही होतात. मात्र कुणी कुणाचा राग धरत नाही. शिवाय हे जखमी लोक दवाखान्यात अथवा डॉक्टरकडे न जाता देवीच्या अंगारा जखमेला लावतात. जितके अधिक लोक जखमी होतील त्या वर्षी तितकाच जास्त पाऊस पडतो, अशी या गावकऱ्यांची धारणा आहे. त्यामुळे गावातील बहुसंख्य लोक जखमी होईपर्यंत ही धुळवड खेळतात. दुपारी ४ वाजेपासून दिवस मावळेपर्यंत प्रतिवर्षी हा दगडफेकीचा खेळ भोयरे गावात रंगतो.
अजब! धुळवडीला महाराष्ट्रातील ‘या’ गावात चक्क दगडांची बरसात आणि रक्ताची उधळण – tradition of celebrating dhulivandan festival by throwing stones at each other in a village in solapur district
सोलापूर : भारतात दर काही मैलांनंतर भाषा बदलते, असं म्हटलं जातं. फक्त भाषेबाबतच नाही तर सण-उत्सव आणि ते साजऱ्या करण्याच्या पद्धतीतही मोठे बदल आढळून येतात. महाराष्ट्रात होळी संपली की धुळवड खेळली जाते. मात्र हा सण साजऱ्या करण्याची सोलापुरातील एका गावात अजब प्रथा आहे. परस्परांवर दगडांची बरसात करत धुळवड खेळण्याची परंपरा सोलापूर जिल्ह्यातील भोयरे गावात आहे. (Dhulivandan Solapur News)