करोना व्हायरस हा कसा पसरतो, याबद्दल तुम्हाला माहिती असेलच. खोकला, शिंक किंवा लाळ या वाटेद्वारे करोना व्हायरस पसरू शकतो. त्यामुळे या गोष्टींपासून सध्या सर्वच जण लांब राहत आहेत. क्रिकेट खेळताना चेंडूला चकाकी आणण्यासाठी त्यावर लाळ लावाली लागते. त्यानंतर चेंडूला चकाकी येते आणि हे गोलंदाजासाठी उपयुक्त ठरत असते. पण या परिस्थितीतून बाहेर पडल्यावर जर क्रिकेटचा सामना सुरु असेल आणि चेंडूवर जर कोणी खेळाडू लाळ लावत असेल तर तो ट्रोल होऊ शकतो.
याबाबत ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स म्हणाला की, ” कसोटी क्रिकेटमध्ये जास्त करून चेंडूला चकाकी आणण्यासाठी लाळ वापरली जाते. त्यामुळे जर यापुढे चेंडूला लाळ लावायची नाही, असे सांगितले गेले तर गोलंदाजांसाठी ही समस्या ठरू शकते.”
क्रिकेट आणि टेनिस या खेळांमध्ये बॉल बॉय असतात. क्रिकेटमध्ये सीमारेषेबाहेर तर टेनिस कोर्टवर बॉल बॉय असल्याचे आपण पाहिले आहे. बऱ्याचदा बॉल हा त्यांच्याकडे जातो. पण मग या त्यांच्याकडून बॉल घ्यायचा की नाही, हा प्रश्नदेखील काही जणांना पडू शकतो.
मार्च महिन्यामध्ये जपान आणि एक्वेडोएर या दोन देशांमध्ये डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेचे काही सामने झाले. या सामन्यांमध्ये बॉल बॉय यांना ग्लोव्हज दिले होते, तर खेळाडूंना वापण्यासाठी दिलेला टॉवेल हा एका टोपलीत ठेवण्यात आला होता. या गोष्टीमुळे बॉल बॉय आणि खेळाडू यांचा जास्त संपर्क झाला नाही. पण दुसरीकडे खेळाडूंना टॉवेल आणि बॉल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही कोर्टवरील स्वयंसेवकांची आहे, असाही सूर निघाला. त्यामुळे यापुढे नेमके करायचे का, याची उत्तरं स्पर्धा सुरु करण्यापूर्वी शोधावी लागतील.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times