जालना : राज्यात आगामी निवडणुकांमुळे आधीच वातावरण तापलं असताना आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या एका विधानामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) २५ आमदार हे अद्यापही भाजपच्या संपर्कात असल्याचा मोठा गौप्यस्फोट रावसाहेब दानवे यांनी केला आहे. ठाकरे सरकारचे हे २५ आमदार अधिवेशनावर बहिष्कार टाकणार होते, पण ते कसेबसे सावरले. पण अजूनही ते भाजपच्या संपर्कात आहेत, असं दानवे यांनी म्हटलं आहे.

रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्यामुळे राजकारणात अनेकांच्या भुवया उंचावल्या. निवडणुका येऊ द्या, एक-एक करुन सगळे भाजपच्या वाघोलीत येऊन पडतील असेही रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे. खरंतर, आज दानवेंचा वाढदिवस आहे तर राज्यभरातही धुळवडीचा उत्सव साजरा होत आहे. यावेळी बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.

Exclusive : नाना पटोलेंच्या उपस्थितीत औरंगाबादच्या मटका किंगचा काँग्रेसमध्ये प्रवेश
दरम्यान, हे आमदार कोण आहेत असा प्रश्न विचारला असता, जे आमदार आमच्या संपर्कात आहेत त्यांची नावं आता सांगू शकत नाही. कारण, त्यांची आमदारकी धोक्यात येईल असेही सूचक वक्तव्य दानवेंनी केलं आहे. ते पुढे म्हणाले की ‘निवडणुकांच्या तोंडावर हे नाराज आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्तही ठरला’ असल्याचं दानवेंनी स्पष्ट केलं.

निवडणुका तोंडावर आल्यामुळे आधीच राजकारण तापलं आहे. अशात दानवेंच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. इतकंच नाहीतर भाजपच्या संपर्कात असलेले हे नाराज आमदार कोण आहेत? याबद्दल आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

कोल्हापुरात भाजपचा उमेदवार ठरला; मात्र काँग्रेस उमेदवाराबाबत निर्माण झाला ट्विस्ट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here