आशुतोषच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयाला मोठा धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. बदलापूरच्या हेंद्रपाडा परिसरात शुभदान ही सोसायटी आहे. या ठिकाणी होळीनिमित्त कार्यक्रम होता. स्पीकरवर गाणी लावून सगळे नाचत होते. आशुतोष देखील नाचत होता. नाचून झाल्यावर तो घरी गेला आणि थोड्याच वेळात त्याच्या छातीत दुखायला लागले. त्याच्या पत्नीने शेजाऱ्यांना याची माहिती दिली. त्यांच्या मदतीने आशुतोषला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला. एका वर्षापूर्वीच आशुतोषचे लग्न झाले होते. आशुतोषच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे बदलापूर पोलिसांनी सांगितले. होळीच्या दिवशी बदलापूर शहरात एक आत्महत्या आणि एक मृत्यू अशा दोन घटना घडल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
होळी खेळून घरी गेल्यानंतर २८ वर्षीय तरूणाच्या छातीत दुखू लागलं. पत्नीनं शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आयसीयूत दाखल केलं होतं. काही वेळात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूचं नेमके कारण न समजल्यानं विच्छेदनासाठी मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली.