मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर थेट आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या नव्या ट्विटने आता खळबळ उडवून दिली आहे. रिसॉर्ट बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये कुठून आले, असा सवाल केल्यानंतर आता थेट ट्विट करून अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडूया, चला दापोली, असं सोमय्यांनी म्हटलं आहे. सोमय्या यांच्या ट्विटनंतर, राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

राज्यात सध्या सत्ताधारी महाविकास आघाडीचे नेते आणि विरोधी पक्ष भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. ठाकरे कुटुंबीयांवरही काही दिवसांपूर्वी सोमय्या यांनी आरोप केले होते. अनिल परब, किशोरी पेडणेकर आणि इतर शिवसेना नेत्यांवरही आरोप केले होते. त्यात काही दिवसांपूर्वीच सोमय्या यांनी अनिल परब यांचे थेट नाव घेऊन, त्यांचा आता नंबर लागणार असल्याचे म्हटले होते.

विधानसभा अध्यक्ष निवड: बाळासाहेब थोरातांचा भाजपवर मोठा आरोप

किरीट सोमय्यांनी आता पुन्हा अनिल परब यांचं थेट नाव घेऊन ट्विट केलं आहे. २६ मार्चला चलो दापोली, अनिल परबचे रिसॉर्ट तोडूया, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. सोमय्यांच्या या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तत्पूर्वी आदल्याच दिवशी सोमय्या यांनी अनिल परब यांना रिसॉर्टसाठी कोट्यवधी रुपये आले कुठून असा सवाल केला होता. आयकर विभागाच्या पत्राचा हवाला देत, पालकमंत्री अनिल परब यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी थेट निशाणा साधला होता. ‘अनिल परब साहेब आयकरचे म्हणणे आहे की कोट्यवधी रुपये आले कोठून? वाझेचे की खरमाटेचे? असा सवाल सोमय्या यांनी केला होता. आता या नव्या ट्विटमुळे येत्या काळात अनिल परब व किरीट सोमय्या यांच्यातील वाद पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत.

Sharad Pawar: घाबरायचं कारण नाही, मी राज्यात भाजपचं सरकार पुन्हा येऊ देणार नाही: शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here