मुंबई : अभिनेता चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या लुक्समुळे अनेकदा चर्चेत असते. अनन्याचे बोल्ड आणि ग्लॅमरस लूक असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे फोटो पाहून तिचे चाहते त्यावर भरभरून कमेन्ट करत असतात. परंतु अनेकदा अनन्या जे कपडे घालते त्यामुळे तिला अनेकदा ट्रोल केलं जातं. याआधी गहराइयां सिनेमाच्या प्रमोशनवेळीही अनन्याने जे कपडे घातले होते त्यामुळे तिला ट्रोल करण्यात आलं होतं. आता देखील अनन्याला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आलं आहे. एका कार्यक्रमात अनन्या सहभागी झाली होती. त्यावेळी तिनं अत्यंत बोल्ड असा ड्रेस घातला होता. त्या ड्रेसमधील तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिचे हे फोटो पाहून युझर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.

पोहायचं की पाहायचं! सुहाना खानचा हॉट स्वीम लुक, व्हिडिओ होतोय तुफान Viral


धर्मा प्रॉडक्शनचा माजी सीईओ अपूर्व मेहता याच्या वाढदिवसाच्या पार्टीमध्ये अनन्या पांडे तिच्या कुटुंबासह सहभागी झाली होती. याशिवाय जान्हवी कपूर, कतरिना-विकी कौशल देखील सहभागी झाले होते. या पार्टीमध्ये अनन्यानं काळ्या रंगाचा पारदर्शक बोल्ड सी-थ्रू ड्रेस घातला होता. अत्यंत बोल्ड ड्रेस घातलेल्या अनन्याने ग्लॉसी मेकअप केला होता. त्याशिवाय केस थोडे कुरळे केले होते. शिवाय तिच्या हातामध्ये काळ्या रंगाचाच डिझायनर क्लच होता. तसंच तिनं ड्रेसला मॅचिंग होतील असे, काळ्या रंगाचे हिल्सही घातले होते. अनन्या जेव्हा पार्टीच्या ठिकाणी पोहोचली तेव्हा सर्वांचं लक्ष तिनं वेधून घेतलं होतं.


या ड्रेसमधील अनन्याचे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले. हे फोटो पाहून युझर्सनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली.अनन्याचा हा फोटो पाहून एका युझरनं लिहिलं की, ‘अगं तू पँट घालायला विसरलीस बहुतेक…’ तर अन्य एका युझरनं तिचा हा बोल्ड अंदाज फॅशन डिझास्टर असल्याचं म्हटलं आहे. अर्थात अशा ट्रोलिंगकडे अनन्या फारसं लक्ष देत नाही. तिच्या चाहत्यांना काय आवडतं, याला ती प्रधान्य देत असते. त्यामुळेच त्यांच्या प्रतिक्रिया तिच्यासाठी महत्त्वाच्या असतात.

अनन्या पांडे

अनन्या पांडेचा धर्मा प्रोडक्शनबाहेरचा नो मेकअप लुक

दरम्यान, अनन्यानं घातलेल्या या ड्रेसची किंमत सुमारे ८ लाख २० हजार इतकी आहे. हा ड्रेस AADNEVIK या ब्रँडचा असून तो कस्टमाईज आहे. म्हणजे खास ऑर्डर देऊन हा ड्रेस तयार करण्यात आला आहे. २३ वर्षांची अनन्या पांडे सध्या ईशान खट्टरबरोबर रिलेशनमध्ये असल्याची जोरदार चर्चा आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here