कर्नाटकातील तुमकूर येथील पावागडानजीक शनिवारी बस उलटून भीषण अपघात झाला. या बसमधून ६० जण प्रवास करत होते. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समजते. तर २० हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
चालकाचे नियंत्रण सुटल्यानंतर बस उलटली, अशी प्राथमिक माहिती मिळते. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रवाशांना स्थानिकांनी आणि प्रशासनाने तात्काळ नजीकच्या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमी असलेल्यांमध्ये काही विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. तुमकूर पोलिसांनी सांगितले की, पागवाडानजीक बस उलटून भीषण अपघात झाला. यात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २० हून अधिक जण जखमी झाले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत असून, त्यात काही विद्यार्थी देखील आहेत.
‘ती न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा देऊन निघून गेली’ म्हणत पतीने मुलीसह जीवन संपवलं