मुंबई : प्रियांका चोप्रा लाॅस एंजलिसला राहूनही सर्व भारतीय सण पद्धतशीरपणे साजरे करत असते. यावळची होळी तिनं आणि निक जोनसनं जोरदार साजरी केली. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दोघांमधलं प्रेमही यावेळी चांगलंच दिसत आहे. प्रियांकाने जोनसला ओठांवर किसही केलं. ही होळी पाहून प्रियांकाचे फॅन्स खूप खूश झाले आहेत. कोण म्हणतंय ‘ प्रियांका देशी जोनस’ तर कोण म्हणत आहे, ‘होळी असावी तर अशी’.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत प्रियांकाच्या हातात पिचकारी आहे. तिच्या आजूबाजूचे लोक हवेत गुलाल उडवत आहेत. तो इतका आहे की त्यामुळे यात प्रियांकाचं घरही दिसत नाही. सगळीकडे गुलालाचा रंगच आहे.

प्रियांकाने दिली मजेशीर कॅप्शन
प्रियांकासोबत निकही खूश होऊन होळी खेळताना दिसते. फोटो शेअर करत तिने कॅप्शन दिली, ‘माझी एक विनंती, चला होळी खेळू या. साॅरी, खेळली.’ आणि हॅशटॅग दिला आहे, #holihai

डीप गळ्याचा व नेटचा ट्रान्सपरंट गाऊन घालून प्रियांका चोप्राने सर्वांदेखत मारली नव-याला मिठी, रोमांस झाला कॅमेरात

निकवर प्रेमाचा वर्षाव
प्रियांकाने फार गोडसा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात ती निकला प्रेमाने kiss करताना दिसत आहे. आपल्या गालाने त्याच्या गालावर रंग लावत आहे. त्यावेळी हळूच निक प्रियांकाच्या भांगात गुलाल भरतो. हा व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला.

प्रियांकाचे होळीचे फोटो viral
प्रियांका चोप्राचे होळीचे फोटो चाहत्यांना आवडतायत. एका फोटोत प्रियांका स्वीमिंग पुलजवळ आरामात पहुडली आहे. दुसऱ्या फोटोत ती काही छोट्या मुलांबरोबर आहे. तिच्या हातात एक पुस्तक आहे. त्यावर लिहिलं आहे, फेस्टिवल ऑफ कलर्स. रंगांचा उत्सव.

प्रियांका चोप्रा

तिने एक ग्रुप फोटो शेअर केला आहे. त्यात तिचे मित्र मेत्रिणी आणि कुटुंबीय आहेत. प्रियांका आणि निक अतिशय आनंदात असल्याचं दिसत आहे. त्यामुळे त्यांचे फॅन्सही खूश आहेत.

नाश्त्याला ‘हा’ पदार्थ पाहून प्रियांका चोप्राला आली मुंबईची आठवण; शेअर केला फोटो

प्रियांका चोप्रा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here