मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा स्टार क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेलने () त्याची भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमणसोबत () लग्न केले आहे. १८ मार्च रोजी दोघांचे लग्न झाले.
मॅक्सवेल आणि विनी दोघेही बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांचा दोन वर्षांपूर्वी १४ मार्च २०२० रोजी साखरपुडा (एंगेजमेंट) झाला होता, पण कोरोनामुळे त्यांना त्यांच्या लग्नासाठी बराच काळ वाट पाहावी लागली. विनी रमनच्या इन्स्टाग्राम पोस्टवरून या लग्नाचा खुलासा झाला आहे. आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनेही () या नवविवाहित जोडप्याचे अभिनंदन केले आहे. माध्यमांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, मॅक्सवेल आणि विनी याआधी २७ मार्चला लग्न करणार होते.

विनी रमनने शेअर केला फोटो
ग्लेन मॅक्सवेलसोबतच्या लग्नाची माहिती स्वत: विनीने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. मॅक्सवेलसोबत लग्नानंतरचा पहिला फोटो शेअर करताना तिने लिहिले आहे की, ‘मिस्टर अँड मिसेस मॅक्सवेल.’

आरसीबीने केले अभिनंदन
आरसीबीने आपला स्टार खेळाडू आणि विनी या नव दांपत्याला त्यांच्या आयुष्यातील नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे, पण लग्नामुळे त्या दौऱ्यातून मॅक्सवेलने नाव मागे घेतले. आयपीएलच्या पहिल्या आठवड्यातही तो खेळताना दिसणार नाही, अशा चर्चा सुरू आहेत. आरसीबीला मध्ये पहिला सामना २७ मार्च रोजी पंजाब किंग्ज विरुद्ध खेळायचा आहे. यापूर्वी मॅक्सवेल हा पंजाबच्याच संघात होता. पण आता तो आरसीबीच्या संघात दाखल झाला आहे. त्यामुळे पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याच्याकडून कशी कामगिरी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असेल. लग्न आणि आयपीएल या दोन्ही गोष्टींसाठी मॅक्सवेलने ऑस्ट्रेलियाच्या संघातून विश्रांती घेतली होती. सध्याच्या घडीला ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका खेळत आहे. पण या मालिकेसाठी संघ जाहीर होण्यापूर्वीच आपण या दौऱ्यावर जाणार नसल्याचे मॅक्सवेलने स्पष्ट केले होते. मॅक्सवेल अखेर विवाहबंधनात अडकला आहे. त्यामुळे आता बायको विनी मॅक्सवेलसाठी लकी ठरते का, याची उत्सुकता चाहत्यांमध्ये असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here