राज्यात आज ९७ नव्या रुग्णांचे निदान झाले असून २५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख २३ हजार ००५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ८९ लाख ०९ हजार ११५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ७२ हजार ३०० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण ०९.९८ टक्के इतके आहे.

 

maharashtra registered 97 new cases in a day
आजची सर्वात मोठी बातमी; करोना रुग्णसंख्येबाबत आज २ वर्षांनंतर आले दिलासादायक वृत्त

हायलाइट्स:

  • गेल्या २४ तासांत राज्यात ९७ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे.
  • गेल्या २४ तासांमध्ये एकूण २५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
  • तर, राज्यात आज ०१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबई: राज्यातील करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत गेले काही दिवस घट होताना दिसत असून आज मोठी घट झाल्याने राज्याला मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज शनिवारी फक्त ९७ नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. विशेष म्हणजे तब्बल दोन वर्षानंतर राज्यातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या शंभरच्या खाली घसरली आहे. यापूर्वी राज्यात एप्रिल २०२० मध्ये कोरोना रुग्णसंख्या शंभरच्या खाली आलेली होती. (maharashtra registered 97 new cases in a day with 251 patients recovered and o1 deaths today)

राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख २३ हजार ००५ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.१० टक्के झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७ कोटी ८९ लाख ०९ हजार ११५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८ लाख ७२ हजार ३०० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. हे प्रमाण ०९.९८ टक्के इतके आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : coronavirus see latest updates maharashtra registered 97 new cases in a day with 251 patients recovered and o1 deaths today
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here