मुंबई- शुक्रवारी देशभरात होळीचा सण साजरा करण्यात आला. दरम्यान, काजोलने एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामुळे ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली. या व्हिडिओमध्ये लोकांना होळीच्या दिवशी पाणी वाचवण्याचं आवाहन करताना दिसली. पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये काजोल ‘सर्वांना होळीच्या शुभेच्छा, पाणी वाचवा आणि सुरक्षित होळी खेळा’ असं म्हणताना दिसत आहे. समाजपयोगी संदेश देऊनही होताना दिसते.

काजोलच्या या व्हिडिओवर कमेंट करताना एका युझरने लिहिले, ‘काजोल जी होळीच्या दिवशी पाणी बचतीचे ज्ञान देत आहे, तिने ‘गुटखा’ चा प्रचार करणाऱ्या नवऱ्याला आधी समजावून सांगितले पाहिजे. लोक गुटखा खातात आणि जमिनीवर आणि भिंतीवर थुंकतात, ते स्वच्छ करायला खूप पाणी लागतं. अजून एका युझरने लिहिलं- ‘जर तुम्हाला एवढं पाणी वाचवायचं असेल तर आठवड्यातून एकदाच आंघोळ करावी.’ एका युझरने लिहिलं, ‘काजोललाच ज्ञान देण्याची गरज आहे. बाकीच्या सणांबद्दल काही बोल. तुझा नवरा लोकांना ‘जुबान केसरी’ म्हणत फिरत आहे. बॉलिवूडकरांना फक्त होळीच दिसते का?

त्याच वेळी, एका युझरने लिहिले, ‘माय नेम इज खान’ चित्रपटाच्या एका सीनसाठी २४ लाख लिटरहून अधिक पाणी वापरले गेले होते आणि होळीच्या वेळी हे लोक पाणी वाचवण्याचं ज्ञान देण्यासाठी येतात. किती दुटप्पी भूमिका आहे ही..’ अजून एका युझरने लिहिले, ‘गुटख्याचे डाग साफ करण्यासाठी फक्त भारतीय रेल्वे दरवर्षी १२० कोटी खर्च करते, त्यामुळे संपूर्ण देशात गुटख्यामुळे किती पाणी आणि पैसा वाया गेला याची कल्पना करा.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here