मुंबई : ‘एमआयएम’चे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी त्यांच्या पक्षाचा राजीनामा देऊन यावे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाप्रमाणे काम करावे. तसे झाल्यास आमचे सर्वोच्च नेते शरद पवार हे इम्तियाज यांना राष्ट्रवादीत नक्कीच घेतील,’ असे ‘राष्ट्रवादी’चे ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी नमूद केले.

एका कार्यक्रमानिमित्त नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या विंचूर येथे आल्यानंतर त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली. उत्तर प्रदेशात ‘एमआयएम’मुळे भाजप जिंकली, असा आरोप राजकीय वर्तुळात होत आहे. तो भविष्यात होऊ नये, म्हणून आम्ही महाविकास आघाडीत सहभागी होण्याचा प्रस्ताव देत असल्याचे इम्तियाज यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना सांगितल्याची चर्चा आहे. ‘तुमच्या तीनचाकी रिक्षाला एक चाक जोडा, मोटर कार करा, बघा ही कार कशी भन्नाट चालेल,’ असेही त्यांनी सुचवल्याचे कळते.

तथापि, शिवसेनेने हा प्रस्ताव स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळ यांनी इम्तियाज यांना राष्ट्रवादीत दाखल होण्याचे आवाहन केले आहे. ‘एमआयएम’ला भाजपची बी टीम म्हणतात. त्यामुळे महाविकास आघाडीसोबत घेण्याचा त्यांचा प्रस्ताव हा अनाकलनीय आहे, असेही ते म्हणाले.

धक्कादायक! मुंबईकरांना मिळतंय भेसळयुक्त दूध, पिशव्यांमध्ये अस्वच्छ पाणी मिसळून…
भाजपने महाराष्ट्रातील सत्ता विसरावी

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडीचे २५ आमदार आमच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य केले आहे. दानवे यांच्या वक्तव्यात काडीचेही तथ्य नाही. हे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सोनिया गांधी, शरद पवार यांचे हे सरकार आहे. पाच वर्षांनंतर तीन पक्ष एकत्रित लढले तर भाजपने महाराष्ट्रातील सत्ता विसरायला हरकत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

Congress vs AIMIM: एमआयएमचा आघाडीला प्रस्ताव; मात्र, काँग्रेसने मांडली ‘ही’ भूमिका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here