औरंगाबाद : आगामी निवडणुकांमध्ये आघाडी करावी, असा प्रस्ताव ‘एमआयएम’चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राजेश टोपे यांच्यासमोर ठेवला आणि राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून दिली. या प्रस्तावानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांकडून तत्काळ हा प्रस्ताव फेटाळण्याच्या प्रतिक्रिया देण्यात आल्या. तर, एमआयएम महाविकास आघाडीत गेल्याने काहीच फरक पडत नसल्याची प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली.

जलील यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर, टोपे त्यांच्या सांत्वनासाठी गेले होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेससमोर आघाडीसाठी प्रस्ताव ठेवल्याचे समोर आले. जलील यांनीही असा प्रस्ताव ठेवल्याला दुजोरा दिला. तर, टोपे सांत्वनासाठी गेले होते, अशा वेळी राजकीय चर्चा अपेक्षित नव्हतीच, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, ‘एमआयएमने भाजपविरोधी असल्याचे कृतीतून सिद्ध करावे. त्यांच्या काही वर्षांच्या वाटचालीतून तसे दिसले नाही. युती किंवा आघाडी समान विचारधारा व समान उद्देश असणाऱ्या पक्षासोबत केली जाते. महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत महाविकास आघाडी स्थापन केली. एमआयएमने अनेक ठिकाणी भाजपला पूरक भूमिका घेतल्या. हे पाहून राजकीय पक्ष नव्हे तर देशातील जनताही त्यांनी भाजपची बी टीम म्हणते. एमआयएमने भाजपविरोधी असल्याचे सिद्ध करुन दाखवावे.’

इम्तियाज जलील राष्ट्रवादीत प्रवेश करणार? युतीच्या चर्चेत छगन भुजबळांचं मोठं विधान
दरम्यान, औरंगाबाद शहरात आलेल्या भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडीत कोणाला घ्यायचं किंवा कोणासोबत जायचे हे त्यांचा निर्णय आहे. यात एमआयएमचे इम्तियाज जलील त्यांच्यासोबत जायला तयार असतील, तर त्यावर टिप्पणी करण्याचे कारण नाही. कोणी कोणासोबत गेले तरी? भाजप स्वबळावर लढणार आहे. तेही संपुर्ण ताकदीनिशी लढणार आहे. आमचं नाणं खणखणीत आहे.’

‘शिवसेना जातीयवादी नाही का?’

खासदार इम्तियाज जलील म्हणाले, ‘काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी महाविकास आघाडी स्थापन करून युती करू केली आहे. एमआयएमला जातीयवादी पक्ष म्हणणाऱ्यांना माझा सवाल आहे. शिवसेना जातीयवादी पक्ष नाही का? राष्ट्रवादी आणि काँग्रेंस यांनी शिवसेना जातीयवादी पक्ष नाही. हे जगासमोर घोषित करावे.’

धक्कादायक! मुंबईकरांना मिळतंय भेसळयुक्त दूध, पिशव्यांमध्ये अस्वच्छ पाणी मिसळून…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here