यवतमाळ : यवतमाळ शहरातील गणपती मंदिर चौकात धुळवडीच्या दिवशी डीजेच्या गाण्यावर नाचताना वाद होऊन ३४ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली. हत्या करणाऱ्यांपैकी ३ आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले असून क्षुल्लक कारणावरून घडलेला हत्याकांड पाहून शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आर्णी शहरात गणपती मंदिर चौकात डिजेच्या गाण्यावर नाचण्याच्या नादात वाद होऊन शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. गणपती चौकातील व चौका बाहेरील असे युवकांचे दोन गट पडून वाद विकोपाला गेला. यातूनच चंदन मनोज सोयम याने अतिष महादेव ढोले (३४) या युवकाला छातीच्या उजव्या बाजूला धारदार शस्त्राने भोसकले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अतिषला आर्णी ग्रामीण रुग्णालयात प्रथोमपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले होते. मात्र घाव वर्मी लागल्याने अतिरक्तस्राव होऊन उपचारादरम्यान युवकाचा मृत्यू झाला.

राष्ट्रवादी-एमआयएमच्या युतीवर पंकजा मुंडेंची एका ओळीत प्रतिक्रिया, म्हणाल्या…
ही वार्ता पसरताच शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. मृतक अतिष ढोले याला एक लहान मुलगा असून ऐन तारुण्यात त्याची क्षुल्लक कारणावरून क्रूर हत्या झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आर्णी पोलिसांनी आरोपी चंदन मनोज सोयम (२४), रोहन मनोज सोयम (२१) व संदीप विजय पेंदोर (२२) या तीन आरोपींना अटक करून त्यांच्यावर कलम ३०७, ३४ अन्वये कारवाई केली असून या हत्याकांडात सहभागी असलेल्या उर्वरित आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. पुढील तपास ठाणेदार पितांबर जाधव करीत आहे.

इम्तियाज जलील राष्ट्रवादीत प्रवेश करणार? युतीच्या चर्चेत छगन भुजबळांचं मोठं विधान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here