मलप्पुरम: केरळमध्ये काल शनिवारी रात्री एका फुटबॉल सामन्यात मोठी दुर्घटना घडली. मलप्पुरम जिल्ह्यातील पुंगोड येथे एका स्थानिक फुटबॉल सामन्यात . या दुर्घटनेत जवळपास २०० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी ५ जण गंभीर असल्याचे कळते.

वाचा-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री सामना सुरू असताना ही घडना घडली. ही दुर्घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. फुटबॉल सामन्यासाठी उभारण्यात आलेली तात्पुरत्या स्वरुपाची गॅलरी अचानक कोसळली. सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दुर्घटनेवेळी मैदानात २ हजारहून अधिक लोक उपस्थित होते. रात्री साडे नऊच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वाचा-
फटका

केरळमध्ये फुटबॉलचा मोठा चाहता वर्ग आहे. सामना कोणताही असो प्रेक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतात. शनिवारी रात्री झालेल्या दुर्घटनेत सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आले होते. प्रेक्षकांना बसण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपाची गॅलरी उभी करण्यात आली होती. ही गॅलरी पूर्ण क्षमतेने भरली होती तरी देखील आयोजकांनी प्रेक्षकांना रोखले नाही. अखेर क्षमतेपेक्षा अधिक गर्दी झाल्याने गॅलरी कोसळली. या गॅलरी सोबत त्याच्या शेजारी उभा करण्यात आलेला लाईटचा मोठा पोल देखील कोसळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here