शहरात जमावबंदीचा निर्णय
दगडफेकीच्या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बोधन शहरात कलम १४४ लागू करण्यात आल्याची माहिती निजामाबादचे पोलीस आयुक्त के. आर. नागराजू यांनी दिली. तसंच घटनास्थळी मोठा पोलीस फौजफाटा तैणात करण्यात आला आणि काही लोकांना ताब्यातही घेण्यात आले.
सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप
शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून झालेल्या वादानंतर जिल्ह्यात भाजप खासदाराने टीआरएसच्या नेत्यांवर गंभीर आरोप केला. ‘बोधन नगरपंचायतीने शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता. मात्र तरीही टीआरएस आणि एमआयएमच्या गुडांनी शहरात तणाव निर्माण केला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून आता बोधन शहराची कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याची उघड धमकीच टीआरएसच्या एका नगरसेवकाने दिली आहे,’ असं ट्वीट निजामाबादचे भाजप खासदार धर्मपुरी अरविंद यांनी केलं.
गृहमंत्र्यांनी घेतला आढावा
बोधन शहरात तणाव निर्माण झाल्यानंतर तेलंगणाचे गृहमंत्री मोहम्मद महमूद अली यांनी फोनवरून पोलीस महासंचालकांशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सध्या शहरातील परिस्थिती नियंत्रणात असून अतिरिक्त बंदोबस्त तैणात करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.