मुंबई- मलायका अरोरा आणि अरबाज खानची प्रेमकथा सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचं लग्न १९९८मध्ये झालं आणि १९ वर्षांनंतर २०१७मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला. त्यांच्या निर्णयामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत आणि लोकप्रिय असलेली जोडी विभक्त होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं. आता त्यांचा घटोस्फोट होऊन अनेक वर्ष झाली आहेत. दोघांनी आपापल्या इच्छेने एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. मलायका बऱ्याचदा घटस्फोटाबद्दल बोलली आहे. पण याबाबत अरबाज खान कधीच बोलला नाही. याबाबत पहिल्यांदाच अरबाज बोलला आहे. याचसोबत ते दोघं वेगळे का झाले याच कारण सांगितलं आहे.

‘बालवीर’ फेम या अभिनेत्रीला ओळखणंही झालं कठीण, बिकीनीमधील फोटो व्हायरल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अरबाज म्हणाला की, ‘माझा मुलगा अरहानसाठी हे खूप कठीण पाऊल होते. मला असं वाटलं की या कठीण प्रसंगावर मात करण्यासाठी मलायकापासून दूर राहणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.’ मुलाची कस्टडी सध्या मलायकाकडे आहे, तेही ठीक आहे असं मला वाटतं. कारण फक्त आईच मुलाची चांगली काळजी घेऊ शकते. याचमुळे अरहानची कस्टडी मिळवण्यासाठी मी कधीही संघर्ष केला नाही,’ या मुलाखतीदरम्यान जेव्हा अरबाजला विचारण्यात आलं की, मुलाला याबद्दल सांगणे खूप कठीण होतं का? त्यावर उत्तर देताना तो म्हणाला की,’त्यावेळी माझा मुलगा फक्त १२ वर्षांचा होता. त्याला सगळं समजत होतं. काय चाललं आहे हे त्याला चांगलंच माहीत होतं आणि त्याला अजिबात आश्चर्य वाटलं नाही.’

‘इंडियाज गॉट टॅलेंट’ मध्ये मोठा बदल, शिल्पा शेट्टीची जागा घेणार ही अभिनेत्री

अरबाज खान

अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायकाचं तिच्यापेक्षा लहान असलेल्या अर्जुन कपूरबरोबर रिलेशन आहे. दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं आहे. या जोडप्याने कधीही त्यांचं नातं लपवलं नाही. काही काळापूर्वी अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा एकमेकांशी लग्न करणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. मात्र अर्जुनने याला नकार दिला होता. तर दुसरीकडे, अरबाज जॉर्जिया एंड्रियानीलाही डेट करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here