नवी दिल्ली :

युक्रेन आणि रशिया दरम्यान सुरू असलेल्या युद्धानं आता अत्यंत धोकादायक वळण घेतलंय. इतर देशांनाही वेगवेगळ्या पद्धतीनं या युद्धाच्या झळा बसत आहेत. अशावेळी दोन्ही देशांनी आपांपसांत चर्चा करून लवकरात लवकर हे युद्धाला पूर्णविराम द्यावा, अशी इच्छा अनेक देशांकडून व्यक्त केली जात आहे. यासाठी भारत, फ्रान्स, अमेरिका, इस्राईल यांसहीत इतर काही देशांकडून प्रयत्नही सुरू आहेत. याच दरम्यान ऑस्ट्रेलियानं युक्रेन संकटावर तोडगा काढण्यासाठी भारतानं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलंय.

युक्रेवर रशियानं केलेल्या हल्ल्यावर भारतानं घेतलेल्या भूमिकेचा ‘क्वॉड’ सदस्यांनी स्वीकार केला आहे. तसंच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपर्कांचा वापर करून युद्धग्रस्त देशांतील संघर्ष संपवण्याचं आवाहन केल्यानं कोणताही देश नाराज होणार नसल्याचंही ऑस्ट्रेलियानं म्हटलंय.

‘एखाद्या देशाशी प्रत्येक देशाचे स्वतंत्र द्विपक्षीय संबंध असतात. भारतीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि पंतप्रधान मोदी यांच्या टिप्पण्यांवरून हे स्पष्ट होतं की त्यांनी युक्रेन संकट संपवण्याचं आवाहन करण्यासाठी आपल्या संपर्कांचा वापर केला आहे… आणि निश्चितच कोणताही देश यामुळे नाराज होणार नाही’ असं वक्तव्य भारतातील ऑस्ट्रेलियन उच्चायुक्त बॅरी ओ’फेरेल यांनी पत्रकारांशी बोलताना केलं.

Ukraine Crisis: युक्रेनची एकाकी झुंज सुरूच; चर्चेसाठी अमेरिका राष्ट्राध्यक्ष पोलंडला देणार भेट
रशियाकडून शाळा लक्ष्य; चारशे लोकांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणी हल्ला
रशिया आणि युक्रेन युद्धात भारतानं तटस्थ भूमिका स्वीकारली असली तरी हे युद्ध लवकरात लवकर संपुष्टात यावं, अशी इच्छा भारतानं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा व्यक्त केलीय. इतकंच नाही तर घनिष्ट संबंध असलेल्या रशियावर भारताकडून टीका करण्यात आली नसली तर भारताकडून रशियाच्या या हल्ल्याला पाठिंबाही देण्यात आलेला नाही. तर दुसरीकडे ‘क्वॉड’ सहभागी देश – अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या देशांकडून युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा तीव्र निषेध केला जातोय. अशा स्थितीत भारत या मुद्द्यावर वेगळी भूमिका घेईल, अशी या देशांची अपेक्षा होती. मात्र रशियाशी असलेल्या जुन्या मैत्रीमुळे भारताने आतापर्यंत रशियन लष्कराच्या हल्ल्यावर थेट प्रतिक्रिया देणं टाळल्याचं दिसून येतंय.

युक्रेनमध्ये जे घडतंय त्याचं भारताकडून कधीही समर्थन करण्यात आलेलं नाही किंवा तसा आरोप करण्याची संधीही एखाद्या देशाला मिळालेली नाही. ६५ वर्षांपूर्वी नेहरुंनी पायंडा पाडलेल्या रणनीतीद्वारे काम करण्याचा भारताकडून प्रयत्न केला जातोय.

दरम्यान, आज भारताचे पंतप्रधान मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन एका व्हर्च्युअल शिखर संमेलनाला कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दोन्ही देशांदरम्यान होणाऱ्या या शिखर परिषदेत युक्रेनच्या संकटावरही चर्चा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येतेय.

युक्रेन युद्ध संपुष्टात आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची भारताची तयारी
Alina Kabaeva: युक्रेन युद्धामुळे पुतीन यांची रहस्यमय प्रेयसी अडचणीत, ‘या’ देशातून बाहेर काढण्याची मागणी
युक्रेनच्या शाळा-सांस्कृतिक केंद्रावर रशियाचा हल्ला, २१ जणांचा मृत्यू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here