धुळे : महाराष्ट्राला हादरवून सोडणारी धक्कादायक घटना धुळ्यात घडली आहे. उपोषणाला बसलेल्या वृद्ध दाम्पत्यांपैकी वृद्ध आजोबांचा उपोषणादरम्यान प्रकृती खालावल्याने मृत्यू झाला आहे तर आजींचीदेखील प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे.
संतप्त नातेवाईकांनी संबंधित दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पावित्रा घेतला असून आजींवर सध्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंबंधी आता पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आहे.