जळगाव : राज्यात आगामी निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडी आणि एमआयएममध्ये युती होणार असल्याच्या चर्चा रंगल्या असताना आता शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट ही युती होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. ‘एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मात्र, या भेटीत काहीही निष्कर्ष निघाला नाही. मुख्यमंत्र्यांनी हेसुद्धा स्पष्ट केलं आहे की, एमआयएमसोबत आमचा कुठलाही संबंध नाही. यामुळे एकप्रकारे मुख्यमंत्र्यांनी एमआयएमला महाविकास आघाडीमध्ये येण्याची सर्व दारे बंद केली आहेत. म्हणून आता एमआयएमने महाविकास आघाडीत येण्याचा विषयच संपवला आहे’, असं शिवसेना मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केलं आहे.

जळगावात ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, ‘खरंतर, जिल्हा परिषदा, महापालिका, नगरपालिका आणि बाकीच्या निवडणुकांच्या तोंडावर असे शब्द कुणी त्यांच्या तोंडामध्ये घातले याचाही अभ्यास करणं गरजेचं आहे. ज्या पध्दतीने काहीजण म्हणतात एमआयएम ही भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे. या बी टीमचा हा पहिला प्रयोग आहे का? अशी शंका-कुशंका लोकांमध्ये आहे.’ इतकंच नाहीतर शिवसेनेचं आणि एमआयएमचं कधीही जुळणार नाही. यामध्ये कुठेही तिळमात्र शंका नाही, असंही सत्तार म्हणाले.
शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यारून वाद: दोन गट भिडले; दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी
एमआयएमला आम्ही सोबत घेणार नाही असा आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतर्फे दिला असल्याचंही सत्तार म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे आता राजकीय पटलावर काय चर्चा रंगणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या भगव्याचा अपमान करणाऱ्यांना चिरडून टाका असं आवाहन मुख्यामंत्र्यांनी केलं आहे. त्यावर बोलतांना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, ‘मुख्यमंत्री यांचा जो आदेश असेल त्या आदेशाचं शिवसैनिक, मंत्री, खासदार, आमदार सगळे निश्चित पालन करतील. मुख्यमंत्री जो निर्णय घेतात तो शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसाठी सर्व नेत्यांसाठी अंतिम आहे.’

Weather Alert : राज्यासाठी पुढील १२ तास धोक्याचे; मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here