मुंबई : अभिनेत्री सोनम कपूर आणि तिचा नवरा आनंद आहुजा यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना ‘गुड न्यूज’ दिली आहे. ही गुड न्यूज देताना सोनमनं तिचा आणि आनंदचा अत्यंत रोमँटिक फोटो शेअर केला आहे. सोनमनं ही बातमी शेअर केल्यानंतर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालाआहे.

सोनम कपूरची पोस्ट

सोनम कपूरनं इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे आणि आनंदचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सोनम आनंदच्या मांडीवर पहुडलेली दिसत आहे. सोनमनं तिच्या पोटावर हात ठेवलेला दिसत आहे. तसंच आनंदनंही सोनमच्या हातावर हात ठेवला आहे. आनंद तिच्याकडे अतिशय प्रेमानं आणि आपुलकीनं बघत आहे.

हे फोटो शेअर करत सोनमनं अत्यंत भावgक पोस्ट लिहिलीआहे. तिनं लिहिलं आहे की, ‘ दोन हृदय… तुझ्या प्रत्येक पावलाशी एकरूप होण्यासाठी आतुर झाली आहेत… एक कुटुंब…तुला पाठिंबा देण्यासाठी आणि प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी वाट बघत आहे… आम्ही तुझ्या स्वागतासाठी आतुरतेनं वाट बघत आहोत. ‘ असं म्हणत तिनं #everydayphenomenal #comingthisfall2022 हे दोन हॅशटॅग वापरले आहेत.

Sher Shivraj Teaser: चिन्मय मांडलेकरचा ‘शेर शिवराज’ पाहाच

सोनमनं ती प्रेग्नंट असल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. तेव्हा सर्वप्रथम तिची चुलत बहीण खुशी आणि अंशुला यांनी कमेन्ट करत तिला शुभेच्छा दिल्या.

सोनम कपूरवर अभिनंदनाचा वर्षाव

त्यानंतर सोनमची खास मैत्रीण करिना कपूर खान हिनं ‘वॉव…ही बातमी ऐकून खूप आनंद झाला आहे. तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा. तुमच्या बाळाशी खेळण्यासाठी उत्सुक आहे. ‘ अशी कमेन्ट केली आहे. याशिवाय वाणी कपूर, दिया मिर्झा, रविना टंडन, शनया कपूर, भूमी पेडणेकर, अनन्या पांडे, जान्हवी कपूर, ताहिरा कश्यप आणि अनेक कलाकारांनी सोनम आणि आनंदला शुभेच्छा दिल्या आहेत.

काजोल तिसऱ्यांदा गरोदर ? त्या फोटोमुळे चर्चेला उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here