इस्लामाबाद, पाकिस्तान :

पाकिस्तानात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींदरम्यान पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या ‘स्वतंत्र’ परराष्ट्र धोरणाचं जाहीररित्या कौतुक केलंय. रशिया आणि युक्रेन युद्धाचा संदर्भ देत ‘भारताचं परराष्ट्र धोरण त्यांच्या नागरिकांच्या हितासाठी आहे’ असंही खान यांनी आपल्या भाषणात म्हटलं.

पंतप्रधानांविरोधात अविश्वास प्रस्ताव

पाकिस्तानी लष्कर आणि विरोधी पक्षांवर निशाणा साधताना रविवारी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाला उचलून धरलं. उल्लेखनीय म्हणजे पाकिस्तानात साडे तीन वर्षांच्या पंतप्रधान इम्रान खान सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव सादर करण्यात आलाय. या प्रस्वावावर २८ मार्च रोजी मतदान होणार होणार आहे.

भारताचं ‘स्वतंत्र’ परराष्ट्र धोरण

‘मी आज भारताचं कौतुक करावसं वाटतंय, त्यांनी नेहमीच परराष्ट्र धोरण स्वतंत्र ठेवलं. ‘क्वॉड’ अंतर्गत अमेरिकेशी युती असूनही ते स्वत:ला तटस्थ म्हणवतात. रशियाकडून तेल आयात करतात, जेव्हा इतर देशांकडून निर्बंध घालण्यात आलेले आहेत. याचं कारण म्हणजे भारताचं परराष्ट्र धोरण त्यांच्या जनतेच्या हितासाठी आहे’ असं म्हणत इम्रान खान यांनी आपल्या देशाच्या परराष्ट्र धोरणाची कमजोर बाजू जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.

युक्रेन युद्ध संपुष्टात आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची भारताची तयारीUkraine Crisis: युक्रेन युद्ध रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांचं ऑस्ट्रेलियाकडून कौतुक
‘अमेरिकेला लष्करी तळ उभारण्यास परवानगी नाकारली’

तालिबानविरुद्ध करावाई करण्यासाठी पाकिस्तानमध्ये एक सैन्य तळ उभारण्याचा अमेरिकेचा प्रस्ताव फेटाळून लावला तेव्हा विरोधकांनी आपल्यावर टीका केली होती, याचीही इम्रान खान यांनी आठवण करून दिली. अमेरिकेला पाकिस्तानमध्ये लष्करी तळ उभारण्याची परवानगी देण्यास सांगण्यात आलं होतं. मी गेल्या २५ वर्षांत कुणासमोर झुकलेलो नाही आणि झुकणार नाही’ असं त्यांनी म्हटलंय. तसंच यावेळी त्यांनी जनरल परवेझ मुशर्रफ यांच्या कार्यकाळात अफगाणिस्तानातील संघर्षातील ८० हजार मृतांची आठवण करून देताना ‘आम्ही शांततेत तुमच्यासोबत आहोत, पण युद्धात नाही’ असं त्यांनी अमेरिकेला बजावलंय.

Ukraine Crisis: युक्रेनची एकाकी झुंज सुरूच; चर्चेसाठी अमेरिका राष्ट्राध्यक्ष पोलंडला देणार भेट
रशियाकडून शाळा लक्ष्य; चारशे लोकांनी आश्रय घेतलेल्या ठिकाणी हल्ला
पंतप्रधान इम्रान खान इतिहासाची पुनरावृत्ती टाळणार?

उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानच्या इतिहासात आजपर्यंत एकही पंतप्रधानाला आपला कार्यकाळ पूर्ण करण्यात यश आलेलं नाही. आता इम्रान खान यांनाही सत्तेतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचमुळे इम्रान खान चिंतेत आहेत. त्यांचा पक्ष ‘तहरिक ए पाकिस्तान’मधील त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडलीय.

पंतप्रधानांविरोधात अविश्वास प्रस्ताव मांडणाऱ्या खासदार मुहम्मद अफजल खान ढांडला यांना नोटीस बजावण्यात आलीय. खासदार ढांडला विरोधकांच्या गोटात सहभागी झाल्याचा आरोप इम्रान खान यांनी केलाय.

अनेक असंतुष्ट खासदार इस्लामाबादच्या सिंध हाऊसमध्ये जमा झालेत. ‘सिंध हाऊस’ही सिंध सरकारची संपत्ती असून पाकिस्तानातील मुख्य विरोधी पक्ष ‘पाकिस्तान पीपल्स पक्ष’ (PPP)द्वारे संचालित केली जातेय. पाकिस्तानच्या सिंध प्रांतात पाकिस्तान पीपल्स पक्षाचीच सत्ता आहे.

पंतप्रधानांविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावासंबंधी विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ, आसिफ अली झरदारी आणि जेयूआयएफ प्रमुख आणि पीडीएम अध्यक्ष मौलाना फजलुर रहमान यांनी इस्लामाबादमध्ये एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली. अविश्वास प्रस्तावासाठी संसदेच्या १७२ हून (बहुमताचा आकडा) अधिक सदस्यांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावा त्यांनी या पत्रकार परिषदेत केला. त्यामुळे इम्रान खान सरकार अल्पमतात जाणार का? याकडे अनेकांचं लक्ष लागलंय.

इम्रान खान यांच्यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पनामा प्रकरणात दोषी ठरवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं अपात्र ठरवलं होतं. त्यानंतर नवाझ शरीफ यांना राजीनामा द्यावा लागला होता.

India Pakistan: ‘भारतीय क्षेपणास्र पाकिस्तानात कोसळणं धोकादायक संदेश’
गलवान संघर्षानंतर… चिनी परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत भूमीवर पाऊल ठेवणार?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here