नवी दिल्लीः निझामुद्दीनमधील तबलीघी जमातच्या मरकझमधील धार्मिक कार्यक्रमामुळे करोनाचा फैलाव झाल्याचं आकडेच सांगत आहेत. आकडे खरं सांगतात, असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सह-सरकार्यवाह मनमोहन वैद्य म्हणाले. तबलीघी जमातचे कार्यकर्ते शोधण्यासाठी मुस्लिमच पुढे येत आहेत आणि त्यांचं कौतुक केलं पाहिजे. तबलीघी जमातचा धार्मिक कार्यक्रमाने करोनाच्या रुग्णांची संख्या ४ दिवसांत दुप्पट झाली. अन्यथा रुग्ण संख्या दुप्पट होण्यासाठी ७ दिवस लागले असते, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी सांगितलं होतं.

केंद्राच्या निर्णयांचं संघाकडून कौतुक

करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रने घेतलेले निर्णय योग्य आहेत. भारताने करोनाच्या सामना करण्यासाठी विकसित देशांच्या तुलनेत चांगलं काम केलं आहे. केंद्र सरकारने जी निर्णायक पावलं उचलली त्याला जनतेनेतून सहकार्य मिळालं, असं वैद्य म्हणाले.

मुस्लिम समाजातून अनेकांचा तबलीघींना विरोध

लॉकडाऊनदरम्यान मजूर आणि गरीबांना जेवण उपलब्ध करुन दिलंय. तसंच हेल्पलाइन नंबर सुरू करून एकूण २५.५ लाख नागरिकांना संघाच्या माध्यमातून मदत करण्यात आलीय, असं वैद्य यांनी सा्ंगितलं. आकडे खरं सांगतात. तबलीघी जमातचा भांडाफोड झाला आहे. मुस्लिम समाजातील अनेक जण त्यांना विरोध करत आहेत. तसंच अनेक मुस्लिम तबलीघी जमातच्या कार्यकर्त्यांचा शोध घेण्यात सरकारची मदत करत आहे. हे कौतुकास्पद आहे, असं मनमोहन वैद्य यांनी सांगितलं.

RSSचे जूनपर्यंत सर्व कार्यक्रम रद्द

करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आरएसएसने ‘प्रतिनिधी सभा’ रद्द केली. बेंगळुरूत ही सभा १५ मार्चपासून सुरू होणार होती. संघातील जवळपास १५०० सदस्यांना रेल्वे आणि विमानाची तिकिटं रद्द करण्यास सांगण्यात आलं. जे आयोजनाच्या ठिकाणी पोहोचले त्यांना तात्काळ परत पाठवलं. हे तबलीघी जमातही करू शकत होती, असं मनमोहन वैद्य म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here