पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांची आज तिथीनुसार जयंती आहे. राज्यभरात उत्साहात आणि मोठ्या धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करा, असं आवाहन मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी पुण्यात झालेल्या सभेत केलं होतं. त्यानुसार आज मनसेकडून राज्यभरात शिवजयंती उत्साहात साजरी केली जातेय. राज ठाकरेंचे पुत्र आणि मनसेचे युवा नेते अमित राज ठाकरे हे स्वत: आज शिवजयंती निमित्त शिवनेरी येथे दाखल झाले आहेत. अमित ठाकरे यांनी शिवनेरी किल्ला पायी सर केला आणि शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्याचप्रमाणे महाअभिषेक केला. शिवाई देवीची पूजा व आरती सुद्धा त्यांनी केली.

अमित ठाकरे यांच्यासोबत मनसे आमदार राजू पाटील, बाप्पू वासगावकर, मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमित ठाकरे यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. `हा माझा राजकीय दौरा नाही. फक्त शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घ्यायला मी आलोय. सगळ्याच शिवभक्तांनी शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन अमित ठाकरे यांनी केले.

amit thackeray at shivneri fort

अमित ठाकरे शिवनेरी किल्ल्यावर


छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर अमित ठाकरे यांच्या हस्ते अभिषक करण्यात आला. तसंच पूजनही करण्यात आलं.

amit thackeray at shivneri fort

अमित ठाकरे शिवनेरी किल्ल्यावर

शिवजयंतीनिमित्त राज ठाकरेंची मनसैनिकांना शपथ

शिवाजी पार्कवर ‘मनसे’चा शिव जयंती सोहळा

दुसरीकडे, ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे हे मुंबईत शिवाजी पार्कवर पोहोचले आहेत. ढोल-ताशांच्या गजरात शिवजयंती साजरी केली जात आहे. हेलिकॉप्टरद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राज ठाकरे यांनी शिवाजी महाराजांना वंदन केले.

सरकार ठाकरेंचं, लाभ पवारांना; गजानन किर्तीकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊत सावधपणे म्हणाले….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here