जेरुसलेम, इस्राईल :

इस्राईलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट येत्या २ एप्रिल रोजी भारत दौऱ्यावर दाखल होत आहे. उभयदेशांतील राजनैतिक संबंधांच्या स्थापनेच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भारत दौरा निश्चित केल्याचं नफ्ताली बेनेट यांनी एका निवेदनात म्हटलंय. पीटीआयनं दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान बेनेट २ एप्रिल ते ५ एप्रिल अशा चार दिवसांच्या भारत भेटीवर दाखल होणार आहेत.

इस्रायली पंतप्रधानांचा चार दिवसांचा भारत दौरा

भारत-इस्रायल संबंध परस्पर कौतुक आणि सहकार्यावर आधारित आहेत’ असंही त्यांनी म्हटलंय. नावीन्य, तंत्रज्ञान आणि सायबर, कृषी आणि हवामान बदल या क्षेत्रात दोन्ही देशांमधील सहकार्य वाढवणे हा आपल्या दौऱ्याचा उद्देश आहे. असल्याचंही पंतप्रधान नफ्ताली यांनी म्हटलंय.

Ukraine Crisis: युक्रेन युद्ध रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांचं ऑस्ट्रेलियाकडून कौतुक
भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान बेनेट शनिवारी, २ एप्रिल २०२२ रोजी भारताचा पहिला अधिकृत दौरा करणार आहेत, असं इस्रायली पंतप्रधानांच्या परकीय माध्यम सल्लागारानं एका निवेदनात म्हटलंय. गेल्या ऑक्टोबर महिन्यात ग्लासगो इथं झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या हवामान बदल परिषदेत (COP26)पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान बेनेट यांची याअगोर भेट झाली होती. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी बेनेट यांना भारताच्या अधिकृत भेटीचं निमंत्रण दिलं होतं. या भेटीमुळे उभय देश आणि महत्त्वाच्या नेत्यांमधील संबंध आणखीन दृढ होतील, अशी आशा इस्राईलनं व्यक्त केलीय.

वाचा : अन्वयार्थ : सहकाऱ्यांनी सोडली साथ; पाक पंतप्रधानांकडून भारताच्या ‘स्वतंत्र’ परराष्ट्र धोरणाचं कौतुक

भारत दौऱ्याबद्दल पंतप्रधान बेनेट यांना उत्सुकता

‘माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आमंत्रणानंतर मला भारताचा पहिला अधिकृत दौरा करताना आनंद होत आहे. सोबतच आम्ही आमच्या देशांमधील संबंध अधिक दृढ करू’, असं पंतप्रधान बेनेट यांनी म्हटलंय.

नरेंद्र मोदी यांनी भारत आणि इस्रायलमधील संबंधांना नव्यानं चकाकी चढवली. यालाही ऐतिहासिक महत्त्व आहे. भारतीय संस्कृती आणि ज्यू संस्कृती या आपल्या दोन अनोख्या संस्कृतींचा दृढ संबंध आहे. आपण भारतीयांकडून अनेक गोष्टी शिकू शकतो आणि त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न करू शकतो, असं म्हणत बेनेट यांनी भारतीय आणि भारतीय संस्कृतीविषयी आपुलकी व्यक्त केलीय.

Ukraine Crisis: युक्रेनची एकाकी झुंज सुरूच; चर्चेसाठी अमेरिका राष्ट्राध्यक्ष पोलंडला देणार भेट
युक्रेन युद्ध संपुष्टात आणण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांची भारताची तयारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here