जळगाव: येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात करोनासदृष्य तीन महिला रुग्णांचा सोमवारी सायंकाळी मृत्यू झाला आहे. तिन्ही रुग्णांचे मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. तसेच तिन्ही रुग्णांचे स्वॅब रिपोर्ट येणे बाकी आहेत. या तीन महिला वयस्कर होत्या. एक महिला मध्य प्रदेशातील तर दोन महिला जळगाव शहरातील आहेत. या वृत्ताला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. खैरे यांनी दुजोरा दिला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील करोना कक्षात सोमवारी दाखल केलेल्या तीन करोनासदृष्य महिला रुग्णांचा मृत्यू झाला. दुपारी दोन ते सायंकाळी सात वाजेदरम्यान या तिन्ही महिला दगावल्या. मृत झालेल्या तीन महिलांपैकी एक महिला जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील होती, दुसरी महिला मध्य प्रदेशातील होती. ही महिला दूर्धर आजार व निमोनियाग्रस्त होती. तिसरी महिला चिरायू हॉस्पिटलमध्ये दाखल होती. तिची प्रकृती चिंताजनक होती. जिल्हा रुग्णालयात दाखल करताच तिला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. या तिन्ही महिला रुग्णांचा स्वॅब रिपोर्ट येणे बाकी आहे. हा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

तीन वर्षाच्या बालिकेचा मृत्यू

जळगाव शहरातील एका तीन वर्षाच्या बालिकेचा सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास संशयास्पद मृत्यू झाला. श्वसन संस्थेतील गुंतागुंतीमुळे तिचा मृत्यू झाल्याने हा करोनाचा तर बळी नाही ना?, अशी भीती वर्तवली जात आहे. बालिकेच्या मृत्यूचे नेमके कारण समोर यावे, म्हणून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय प्रशासनाने आवश्यक नमुने घेतले असून ते कोरोना चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. या चाचणीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच बालिकेच्या मृत्यूचे खरे कारण समोर येणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here