Sharad Pawar | नवाब मलिक सध्या ईडीच्या कोठडीत आहे. त्यांना ३ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या खात्यातील काम मागे पडू नये म्हणून त्यांच्या खात्याची जबाबदारी इतर मंत्र्यांकडे देण्यात आल्याचे समजते.

 

Sharad Pawar Uddhav
Sharad Pawar: गेल्याच आठवड्यात मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता.

हायलाइट्स:

  • शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला
  • लवकरच औपचारिकरित्या अल्पसंख्याक खात्याचा कारभार जितेंद्र आव्हाड तर कौशल्य विकास मंत्रालयाचा कारभार राजेश टोपे यांच्या हातात येईल
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून सातत्याने नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेण्याची मागणी केली जात आहे. तरीही महाविकास आघाडी सरकार मलिकांचा राजीनामा न घेण्यावर ठाम आहे. मात्र, नवाब मलिक सध्या तुरुंगात असल्यामुळे त्यांच्या खात्यातील कामे खोळंबली आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या खात्यांचा कारभार तुर्तास अन्य मंत्र्यांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अल्पसंख्याक मंत्रालयाची धुरा जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी राजेश टोपे यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.
नवाब मलिकांच्या सुटकेसाठी तीन कोटी मागितले; मुलाची पोलिसात तक्रार
गेल्याच आठवड्यात मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर सोमवारी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. तेव्हा शरद पवार यांनी नवाब मलिक यांच्या खात्याचा कारभार राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतर मंत्र्यांकडे वर्ग करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना कळवल्याचे समजते. मुख्यमंत्री याबाबत लवकरच निर्णय घेतील. त्यामुळे लवकरच औपचारिकरित्या अल्पसंख्याक खात्याचा कारभार जितेंद्र आव्हाड तर कौशल्य विकास मंत्रालयाचा कारभार राजेश टोपे यांच्या हातात येईल.
नवाब मलिकांकडील मंत्रिपदांबाबत अखेर राष्ट्रवादीचा मोठा निर्णय; जयंत पाटील यांनी दिली माहिती
नवाब मलिक यांना ईडीने २३ फेब्रुवारीला अटक केली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्ष आणि खासकरून देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांच्या राजीनाम्यासाठी गेल्या काही दिवसांत रान उठवले होते. अखेर २३ दिवसांनी राजीनाम्याऐवजी मलिकांना बिनखात्याचे मंत्री करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला होता. तसेच नवाब मलिक यांच्याकडील मुंबई प्रदेशाध्यक्षपदाचा कारभारही नरेंद्र राणे आणि राखी जाधव यांच्याकडून विभागून देण्यात आला आहे. या दोघांची कार्याध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : ncp chief sharad pawar talk with cm uddhav thackeray on phone regarding nawab malik cabinet portfolio
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here