Gondia News : गोंदिया जिल्हा हा वनसंपदेनं नटलेला असून जिल्यात मोठ्या प्रमाणात जंगल व्याप्त परिसर असून उन्हाळ्यात जंगलात वणवा पेटण्याच्या अनेक घटना घडतात. त्यामुळे मौल्यवान वनसंपदेचं नुकसान होतं. सोबतच वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका असतो. या घटना थांबवण्यासाठी जंगल व्याप्त परिसरातील स्थानिक युवक पुढाकार घेऊन मदतीचा हात देत, वणवा थांबविण्यासाठी पुढे आले आहेत. तर पाहुया वणव्यांपासून वनसंपदेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी या युवकांनी काय शक्कल लढवली आहे. 

जंगल व्याप्त परिसरात आग लागून झाडांच्या बरोबरच वन्य जीवनाची देखील हानी होत असते. यात वनसंपदा बरोबरीनं मानवी जीवित हानी होत असल्याच्या घटना नेहमीच आपण ऐकतो. मात्र या घटना आपण कशा पद्धतीनं थांबवू शकतो. याकरता पुढाकार घेणारा एकमेव गट ग्रामपंचायत मिसपीरी समोर आला आहे. येथील सरपंच, उपसरपंच आणि सदस्य यांनी पुढाकार घेत पुढे आले आहेत. या ग्रामपंचायत क्षेत्रात येणाऱ्या गावातून युवकांना प्रोत्साहित करून एक वन संवर्धन स्वयंसेवक संघ तयार करण्यात आले आहे. 

गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील नक्षलग्रस्त अतिदुर्गम मिसपीरी गट ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या परिसरात उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटना समोर येत आहेत. या घटनांवर आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीनं पुढाकार घेऊन गावातील युवकांना स्वयंसेवक बनून त्यांच्यासोबत गावकऱ्यांना जंगलात वणवा लागल्यास आग कशी विझवावी? याची प्रात्यक्षिकं दाखविण्यात आलं. जेणेकरून जंगलातील झाडांचं रक्षण होऊन वन्यजीव धोक्यात येणार नाही. नागरिकांनीसुद्धा यास प्रतिसाद देत जंगलातील वणवा लागू देणार नाही आणि वनसंपदा रक्षण करण्यासाठी आता पुढाकार घेत आहेत. मिसपीरी ग्रामपंचायतीप्रमाणे घेतलेल्या पुढाकारा प्रमाणे जिल्यातील इत्तर ग्राम पंच्यातीने घेतला तर जिल्यात उन्हाळ्यात वणवा लागण्याच्या घटनेत घट होईल हे मात्र निश्चित. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here