कीव्ह, युक्रेन :

रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा २७ वा दिवस आहे. जवळपास महिन्याभराच्या कालावधीतही बलाढ्य रशियाला कीव्हवर ताबा मिळवणं शक्य झालेलं नाही. रशियाकडून सलग युक्रेनच्या वेगवेगळ्या शहरांना लक्ष्य केलं जातंय. यात सामान्य नागरिकांना जबर फटका बसतोय. युक्रेनच्या शहरांवर बॉम्ब आणि क्षेपणास्त्राच्या सहाय्यानं हल्ले केले जात आहेत. याच दरम्यान रशियन सेनेनं युक्रेनच्या दक्षिण भागातील खेरसन शहरात आंदोलन करणाऱ्या निशस्त्र नागरिकांवर बेधुंद गोळीबार केल्याचा आरोप युक्रेन नेत्यांकडून करण्यात आलाय. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओत हल्ल्यादरम्यान नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत.

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘रशियन सैनिकांनी खेरसनमध्ये आंदोलकांवर गोळीबार केला. हे आंदोलक दक्षिणेकडील मॉस्को शहरावर कब्जा करण्याच्या विरोधात निदर्शनं करत होते’, असा दावा कुलेबा यांनी या व्हिडिओसहीत केलाय.

रशियाला युक्रेन नागरिकांकडून मोठा विरोध केला जातोय. समोर आलेल्या आणखीन एका व्हिडिओत, खेरसन भागात रशियन सेनेसमोर स्थानिक नागरिक गोळा झालेले आणि जोरदार घोषणाबाजी करताना दिसून येत आहेत. तर समोरून येत असलेल्या गर्दीमुळे भेदरलेले रशियन सैन्य अगोदर आपल्या गाड्या मागे हटवताना या व्हिडिओत दिसले.

Ukraine Crisis: युक्रेनची एकाकी झुंज सुरूच; चर्चेसाठी अमेरिका राष्ट्राध्यक्ष पोलंडला देणार भेटअन्वयार्थ : सहकाऱ्यांनी सोडली साथ; पाक पंतप्रधानांकडून भारताच्या ‘स्वतंत्र’ परराष्ट्र धोरणाचं कौतुक
शॉपिंग सेंटरवर गोळीबार

दरम्यान, युक्रेनची राजधानी कीव्ह स्थित एका शॉपिंग सेंटरवर रशियन सैन्यानं गोळीबार केला. या गोळीबारात जवळपास आठ जणांचा मृत्यू झाला. ओडेसामध्येही रशियन सेनेकडे रहिवासी इमारतींवर हल्ले करण्यात आल्याचा आरोप युक्रेनियन अधिकाऱ्यांनी केलाय.

Russian soldiers opened fire at rally

खेरसन शहरात रशियन लष्कराकडून निशस्त्र आंदोलकांवर बेधुंद गोळीबार (ही दृश्यं तुम्हाला विचलीत करू शकतात)


युक्रेनचा शरणागती पत्करण्यास नकार

मारियुपोल भागात रशियन सैन्यासमोर शस्त्र टाकून शरणागती पत्करण्याची मागणी युक्रेननं फेटाळून लावलीय. ‘युक्रेन कधीही रशियासमर झुकणार नाही. कीव्ह, मारियुपोल किंवा खारकीव्ह यांसारखी शहरं रशियाचा ताबा कधीही स्वीकार करणार नाहीत’, असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की म्हटलंय.

युद्ध गुन्ह्यांवर पेन्टॉगॉनचं लक्ष

रशियन हल्ल्यांनंतर युक्रेनमध्ये बिकट होत चाललेल्या बिकट परिस्थितीवर ‘पेन्टागॉन’ही लक्ष ठेवून आहे. रशियन सैन्याने युक्रेनमध्ये युद्ध गुन्हेगारी केल्याचा आरोप पेन्टागॉनकडून सोमवारी करण्यात आलाय. ‘रशियन सैन्य युद्ध गुन्हे करत असल्याचे स्पष्ट पुरावे आम्हाला दिसून येत आहेत. पुरावे गोळा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत’ असं पेन्टागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी म्हटलंय.

India Israel: मोदींचं आमंत्रण स्वीकारलं; इस्राईल पंतप्रधानांचा भारत दौरा निश्चित
Ukraine Crisis: युक्रेन युद्ध रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांचं ऑस्ट्रेलियाकडून कौतुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here