नवी दिल्ली: देशाची राजधानी नवी दिल्ली एका भयंकर घटनेनं हादरली. येथील मालवीय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चिराग दिल्ली गावात जन्मदात्या आईनंच आपल्या पोटच्या मुलीची हत्या केली. तिने आपल्या दोन महिन्यांच्या मुलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह ओव्हनमध्ये टाकला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. मात्र, तोपर्यंत खूपच उशिर झाला होता. मुलीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.

दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिराग दिल्ली गावात गुलशन कौशिक हा पत्नी डिंपल, चार वर्षांचा मुलगा आणि दोन महिन्यांच्या मुलीसह राहत होता. मुलाच्या हव्यासापोटी डिपलनं धक्कादायक पाऊल उचललं. सोमवारी तिनं आपल्या दोन महिन्यांच्या मुलीचा गळा आवळला. त्यानंतर तिला ओव्हनमध्ये टाकलं. दिल्ली पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं. मात्र, तोपर्यंत खूपच उशिर झाला होता. दोन महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला होता.

हृदयद्रावक! उल्हासनगरात श्वानाला डंपरने चिरडले; चार पिल्ले झाली मायेला पारखी

bullock cart race : थरारक… शर्यतीवेळी बैलगाडा थेट गर्दीत घुसला; १ ठार, अनेक जखमी

दिल्ली पोलिसांना सोमवारी दुपारी सव्वातीन वाजताच्या सुमारास चिराग गावातून मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाली होती. पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी चिमुकलीचा शोध सुरू केला. बराच वेळ शोध घेतल्यानंतर एका ओव्हनकडे पोलिसांचे लक्ष गेले. पोलिसांनी ओव्हन उघडून बघितले. त्यातील दृश्य बघून पोलीस हादरले. ओव्हनमध्ये दोन वर्षांच्या चिमुकलीचा मृतदेह होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी मुलीच्या आईला आणि बापालाही ताब्यात घेतलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here