पालघर- जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या २१ झाली असून यात एकूण चार मृतांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १,२२१ संशयित नागरिकांची छाननी करण्यात आली असून त्यातील १९० जण अधिक जोखमीचे असून तर १४९ कमी जोखमीचे आहेत, तसेच ६६ जणांना श्वसनाचा त्रास होत आहे.
जिल्ह्यात ५२० जण विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे, तर विविध ठिकाणी छावणीत १८२ जणांना ठेवण्यात आलेल्यांपैकी ८१ जणांना रजा देण्यात आली आहे, तर हॉटेल रॉयल गार्डनमध्ये ४६ जणांना तर हॉटेल सुवी पॅलेसमध्ये ५५ जणांवर उपचार सुरू आहेत.
विलगीकरणासाठी ठेवण्यात आलेल्या ४९९ जणांनी १४ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. कस्तुरबा रुग्णालयात तिघे, ठाणे सर्वसाधारण रुग्णालयात सहा, जसलोक रुग्णालयात दोघे, एमजीएमआर रुग्णालयात तिघे, रहेजा रुग्णालयात एक, बोळींज रुग्णालयात २० जण निगेटिव्ह आले आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times