मुंबई :द काश्मीर फाइल्स‘ सिनेमानं लोकप्रियतेचा उच्चांक मोडला आहे. काश्मीर खोऱ्यात ९० त्या दशकामध्ये काश्मिरी पंडितांवर झालेल्या अन्यायावर हा सिनेमा आधारित आहे. हा सिनेमा पाहून प्रत्येकाचं काळीज पिळवटून निघालं आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या सिनेमानं जबरदस्त कमाई केली आहे. या सिनेमाबद्दल दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये एका आठवण शेअर केली होती. ही आठवण होती गानसाम्राज्ञी दिवंगत गायिका लता मंगेशकर यांच्याबद्दलची.

काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?

लता मंगेशकर

विवेक अग्निहोत्री यांनी सांगितलं की, ‘ खरं तर द काश्मीर फाइल्स सिनेमात एकही गाणं नाही. सिनेमाचं कथानक हृदयद्रावक आहे. शिवाय या सिनेमातून काश्मिरी पंडितांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. सिनेमासाठी गाणं मी काश्मिरी लोकगायकाकडून रेकॉर्ड करून घेतलं होतं आणि हे गाणं लतादिदींनी गावं अशी आमची इच्छा होती. वास्तविक त्यावेळी लतादिदींनी सिनेमांसाठी गाणं पूर्णपणं थांबवलं होतं. परंतु तरी देखील आम्ही त्यांना विनंती केली होती. पल्लवी लतादिदींच्या खूप निकट होती. तिनं त्यांना गाण्याची विनंती केल्यामुळे त्या देखील तयारही झाल्या होत्या. काश्मीर प्रांताबद्दल लतादिदींना खूप जिव्हाळा, आपुलकी होती. त्यामुळेच करोना संपल्यानंतर त्या रेकॉर्डिंगसाठी तयार होत्या. त्यांना स्टुडिओमध्ये जाऊन रेकॉर्डिंग करण्याची परवानगी डॉक्टरांनी दिली नव्हती. ती परवानगी मिळेपर्यंत आम्ही थांबायचं ठरवलं. परंतु तोपर्यंत त्यांनाच करोनानं गाठलं आणि आपल्यातून हिरावून नेलं. त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करण्याचं आमचं स्वप्न अपूर्णच राहिलं.’

The Kashmir Files Box Office- ‘स्पायडर मॅन’लाही उडवून लावलं

विवेक अग्निहोत्री

‘द काश्मीर फाइल्स’ सिनेमामध्ये १९९० मध्ये काश्मीर खोऱ्यात काश्मिरी पंडितांचा झालेला छळ, त्यांच्यावर झालेला अन्याय दाखवलाआहे. काश्मीर खोऱ्यातील पंडितांवर झालेला अत्याचार पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर दाखवण्यात आला आहे. हा सिनेमा खोटा असून तो काल्पनिक कथानकावर आधारलेला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याबाबत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सांगितलं की, ‘ हे आरोप सर्व खोटे आहेत. काही लोकांनी काश्मीरचा व्यापारासाठी वापर केला आहे. परंतु आमच्या सिनेमामुळे काश्मीरमधील वास्तव जगासमोर मांडलं. समाजामध्ये अतिरेकी कारवाया सुरू होतात आणि त्याला समाजाच्या एका विशिष्ट विचारधारेकडून पाठिंबा मिळतो तेव्हा ऱ्हासाला सुरुवात होते. त्यामुळे काश्मीरचा केवळ व्यवसाय करणाऱ्यांची पंचाईत झाली आहे. त्यामुळेच त्यांनी आमच्यावर वाट्टेल ते आरोप केले आहेत.’ द काश्मीर फाइल्स सिनेमामध्ये अनुपम खेर, मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, दर्शन कुमार, चिन्मय मांडलेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘मला काश्मीर फाइल्सचा तिटकारा आला आहे,’ दिग्दर्शकाच्या मतावर विवेक अग्निहोत्रींचं उत्तर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here