
प्रसिद्ध दिग्दर्शक कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ हा चित्रपट २४ डिसेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज करण्यात आला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींहून अधिक कमाई केली. १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या विश्वचषक विजयावर आधारित चित्रपटात, रणवीर कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत आहे, तर दीपिका पदुकोणने त्यांची पत्नी रोमी देवची भूमिका केली आहे. रणवीर सिंगचा ‘८३’ हा चित्रपट टीव्हीवर २० मार्च रोजी दाखवण्यात आला. २१ मार्च रोजी नेटफ्लिक्स आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर आला. हिंदी व्यतिरिक्त, चित्रपट दोन्ही प्लॅटफॉर्मवर तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये उपलब्ध आहे.
Video- भारतात कधी येणार प्रियांका चोप्राची मुलगी?, मावशी परिणीतीने दिलं उत्तर

‘रुहानियत’ ही वेब सिरीज एमएक्स प्लेयरवर २३ मार्चला येत आहे. हा एक रोमँटिक ड्रामा आहे, ज्यामध्ये अर्जुन बिजलानी, अमन वर्मा, कनिका मान, स्मिता
बन्सल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या वेब सीरिजचं दिग्दर्शन ग्लेन बॅरेटो आणि अंकुश मोहला यांनी केलं आहे. तर गेल्या वर्षी रिलीज झालेला विज्ञानावर आधारित ‘ड्युन’ या चित्रपटाला ९४ व्या अकादमी पुरस्कारांमध्ये १० नामांकनं मिळाली आहेत. डेनिस विलेनेव दिग्दर्शित या चित्रपटात ऑस्कर आयझॅक, रेबेका फर्ग्युसन, टिमोथी कॅल्मेट, जोश ब्रोलिन, झेंडाया, चांग चेन, जेसन मोमोआ अशा अनेक नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत. ड्युन २५मार्च रोजी अॅमेझोन प्राइम व्हिडिओवर रिलीज होत आहे.
The Kashmir Files: सिनेमासाठी लता मंगेशकर यांनी दिलं होतं हे वचन!

‘ब्रिजरटन’ या रोमँटिक ड्रामाचा दुसरा सिझन २५ मार्च रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. पहिला सीझन २०२० मध्ये रिलीज झाला होता. आठ एपिसोडच्या या सीझनला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. त्याचा तिसरा आणि चौथा सिझनही येणार असल्याच्या बातम्या आहेत. याचसोबत कोरियन वेब सिरीज ‘स्नोड्रॉप’चा सातवा भाग २३ मार्च रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर रिलीज केला जाईल. याशिवाय ‘द वंडरफुल स्प्रिंगटाइम विथ मिकी माऊस’ ही वेबसीरिज देखील २५ मार्चला येत आहे. ‘द वंडरफुल वर्ल्ड ऑफ मिकी माऊस’चा हा दुसरा सीझन आहे.